*फलटणमध्ये १०१ शिक्षकांचा ऐतिहासिक सन्मान सोहळा संपन्न; सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या पुढाकाराला यश!*
माजी खासदार मा. श्री. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते आणि आमदार मा. श्री. सचिनजी पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा ऐतिहासिक सोहळा पार पडला.
फलटण : फलटण तालुक्यातील २०२३-२४ पासून प्रलंबित असलेल्या आदर्श शिक्षक पुरस्कारांचा प्रश्न पंचायत समिती फलटणच्या नव्या पिढीच्या आदर्श विचाराच्या आणि नव्या पिढीतील लोकप्रतिनिधींच्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या अल्पावधीतच आपल्या सर्वसामान्यांच्या आणि प्रशासकीय कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या समवेत समन्वय साधून सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या विशेष पुढाकारातून मार्गी लागला असून, जिल्हा परिषद सातारा आणि पंचायत समिती फलटण यांच्या वतीने तब्बल १०१ शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करून त्यांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात संपन्न झाला.
जिल्ह्यात सर्वाधिक शिक्षकांना पुरस्कार देण्याचा मान फलटण तालुक्याला मिळाला असून, शिक्षकांच्या कार्याची दखल घेणारा हा उपक्रम विशेष कौतुकास्पद ठरला.
या उपक्रमासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि तालुक्याच्या सर्व क्षेत्रातील सकारात्मक विकासासाठी सदैव प्रयत्नशील असणाऱ्या आमदार सचिन पाटील यांचे विशेष मार्गदर्शन त्यांना लाभले.
अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुरस्कारांचा विषय मार्गी लावून शिक्षकांना त्यांच्या कार्याची पोचपावती मिळवून देण्याचा संकल्प सभापती शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी केला होता. शिक्षकांच्या मेहनतीचा सन्मान व्हावा, त्यांना नव्या जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळावी आणि शिक्षण क्षेत्रात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने त्यांनी विशेष प्रयत्न केले.
यावेळी मनोगत व्यक्त करताना सभापती शिवांजली भोसले म्हणाल्या की, शिक्षक हे केवळ विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञान देत नाहीत, तर त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा देऊन एक चांगली पिढी घडवण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करतात. शिक्षकांचा सन्मान म्हणजे उद्याच्या भविष्याचा सन्मान आहे.
ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी, विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळवून देण्यासाठी आणि शिक्षकांच्या अडचणी सोडवण्यासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रलंबित प्रश्नाला न्याय, १०१ शिक्षकांचा सन्मान आणि शिक्षण क्षेत्राला नवी ऊर्जा देणारा हा सोहळा फलटणच्या शैक्षणिक इतिहासातील एक अविस्मरणीय पर्व ठरला!
पंचायत समितीच्या आणि जिल्हा परिषद साताराच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राबरोबरच दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून गोरगरीब शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्पही सभापती कुमारी शिवांजली यांचा असून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या साह्याने प्रयत्नशील राहणार असून
असा मानस आणि. लोकप्रतिनिधी या नात्याने शिक्षण क्षेत्रातील शिक्षकांना मनोबल वाढवण्याच्या उद्देशाने या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते असे प्रतिपादन
कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले सभापती, पंचायत समिती फलटण यांनी केले आहे.