राज महाराष्ट्र टाईम्स
search

पालकमंत्री शंभूराजे देसाई आढावा बैठकीत फलटण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी आमदार सचिन पाटील यांची लक्षवेधी सूचना

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पालकमंत्री शंभूराजे देसाई आढावा बैठकीत फलटण तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीसाठी आमदार सचिन पाटील यांची लक्षवेधी सूचना
“

फलटण तालुक्यातील संभाव्य चारा व पाणी टंचाई उपाय योजना, टँकर, विहीर अधिग्रहण हातपंपाच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन चारा बियाण्यांची उपलब्धता याबाबत पालकमंत्र्यांच्या आढावा बैठकीत फलटण तालुक्यासाठी आमदार सचिन पाटील यांची आग्रही मागणी आणि लक्षवेधी सूचना.

फलटण तालुक्यातील संभाव्य पाणी व चारा टंचाईवर उपाययोजनांसाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

टंचाईग्रस्त गावांमध्ये टँकर, विहीर अधिग्रहण व हातपंपांच्या माध्यमातून पाणीपुरवठ्याचे नियोजन; चारा टंचाई टाळण्यासाठी शेतकऱ्यांना चारापिकांचे बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना


सातारा : अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे सातारा जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने निर्माण झालेल्या पाणी व चारा टंचाईच्या परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यासाठी पालकमंत्री मा.ना. श्री. शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा येथे महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीत फलटण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाई आणि चारा टंचाईच्या प्रश्नावर आमदार सचिन पाटील यांनी विशेष लक्ष केंद्रित करून त्यावर तातडीने व प्रभावी उपाययोजना करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात केली.

खालील प्रमुख मुद्यांवर आमदार सचिन पाटील यांनी पालकमंत्र्याचे लक्ष वेधले


फलटण तालुक्यातील नागरिक, शेतकरी बांधव आणि पशुधनाला संभाव्य टंचाईच्या संकटाचा सामना करावा लागू नये, यासाठी शासनाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना वेळेत राबविण्याची भूमिका या बैठकीत मांडण्यात आली. टंचाई निर्माण झाल्यानंतर उपाययोजना करण्याऐवजी संभाव्य परिस्थितीचा पूर्वअंदाज घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यावर विशेष भर देण्यात आला.


पाणीटंचाई निवारणासाठी विविध पर्यायांवर नियोजन


फलटण तालुक्यातील जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजना तसेच विविध पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे याबाबत बैठकीत संबंधित विभागाकडून माहिती घेण्यात आली. ही कामे प्राधान्याने व तातडीने पूर्ण करण्याच्या दृष्टीने आवश्यक निर्णय घेण्यात आले. पाणीपुरवठा योजनांची कामे वेळेत पूर्ण झाल्यास ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.


संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन टंचाईग्रस्त गावांमध्ये आवश्यकतेनुसार हातपंप (बोअर) घेणे, विहिरींचे अधिग्रहण करणे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देणे, तसेच परिसरातील उपलब्ध विविध पाणी स्रोतांचा शोध घेऊन त्यांचा प्रभावी वापर करण्याबाबत नियोजन करण्यात आले. कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक त्या उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली.


२.५० लाख पशुधनासाठी चारा उपलब्धतेचा प्रश्न ऐरणीवर


फलटण तालुक्यात सुमारे २ लाख ५० हजार पशुधन असून सध्याच्या परिस्थितीत पुढील तीन महिन्यांपुरेल इतकाच सुका व हिरवा चारा उपलब्ध असल्याची बाब बैठकीत निदर्शनास आमदार सचिन पाटील आणून दिली. त्यानंतर पावसाची परिस्थिती अनुकूल न राहिल्यास तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चारा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर होण्यापूर्वीच नियोजनबद्ध उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे मत आमदार पाटील यांनी व्यक्त केले.


यासाठी कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये चारा पिकांच्या लागवडीबाबत जनजागृती व प्रबोधन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. शेतकऱ्यांना चारा पिकांचे बियाणे उपलब्ध करून देणे, चारा उत्पादन वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करणे आणि उपलब्ध संसाधनांचा योग्य वापर करून भविष्यातील चारा टंचाई टाळण्यासाठी प्रयत्न करण्याबाबत नियोजन करण्यात आले.


वेळीच चारा पिकांची लागवड केल्यास आगामी काळात पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता वाढण्यास मदत होईल आणि शेतकरी बांधवांवरील संभाव्य आर्थिक संकटाची तीव्रता कमी करता येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.


शेतकरी व पशुपालकांना दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध


फलटण तालुक्यातील पाणी व चारा टंचाईचा प्रश्न केवळ प्रशासकीय पातळीवर न ठेवता त्यावर प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या माध्यमातून उपाययोजना करण्याची आवश्यकता या बैठकीत अधोरेखित करण्यात आली. पाणीपुरवठा योजनांची अपूर्ण कामे पूर्ण करणे, टंचाईग्रस्त गावांसाठी पर्यायी पाणी स्रोत उपलब्ध करणे आणि पशुधनासाठी चाऱ्याचे आगाऊ नियोजन करणे या बाबींना प्राधान्य देण्याचे ठरविण्यात आले.


संभाव्य टंचाईच्या काळात फलटण तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, तसेच पशुधनाचे संरक्षण व्हावे, यासाठी शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

आमदार सचिन पाटील यांनी उपस्थित केलेल्या सर्व मुद्यांवर सकारात्मक चर्चा होऊन तालुक्यातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन पालकमंत्री यांनी यावेळी दिले.

या बैठकीस राज्याचे ग्रामविकास मंत्री मा.ना. श्री. जयकुमार गोरे, पुनर्वसन मंत्री मा.ना. श्री. मकरंद आबा पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री मा.ना. श्री. शिवेंद्रसिंहराजे भोसले, जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रियाताई शिंदे, आमदार अतुलबाबा भोसले, आमदार महेशदादा शिंदे, आमदार मनोजदादा घोरपडे, आमदार धैर्यशीलदादा कदम, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजूभैया भोसले, जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

निकृष्ट खावा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले ,दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी.
आरोग्य

निकृष्ट खावा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले ,दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी.

हर्षदा देशमुख (जाधव) यांचा विजय भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय
राजकीय

हर्षदा देशमुख (जाधव) यांचा विजय भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय

फलटण येथे ऐतिहासिक आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न. मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या पुढाकराला मोठे यश.
सामाजिक

फलटण येथे ऐतिहासिक आदर्श शिक्षक सन्मान सोहळा संपन्न. मा.खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते आमदार सचिन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत फलटण पंचायत समितीच्या सभापती कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले यांच्या पुढाकराला मोठे यश.

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

ANCHOR AD SLOT