💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥
फलटण.
फलटण नगर परिषदेच्या वतीने फलटण शहरातील नागरिकांना दुष्काळी परिस्थितीमुळे पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. दिनांक 16 ऑक्टोबर 2026 पासून शासनाच्या निर्देशानुसार पुरवठ्यामध्ये 16 टक्के कपात करून नागरिकांना अत्यावश्यक तेवढाच पाणी वापर करावा असे जाहीर आवाहनही फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
फलटण शहरातील स्विमिंग पूल आणि वाहनांचे वॉशिंग सेंटर पुढील आदेश होईपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे जाहीर आवाहनही फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
अशी गंभीर परिस्थितीअसताना सुद्धा फलटण शहरात ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा अनुभव पुन्हा एकदा नागरिकांना आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंतर्गत पालखी महामार्ग व चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे. लोकप्रतिनिधींचा अथक प्रयत्नाने फलटण शहरात विकासाची कामे गती घेत असून मागील दोन-तीन दिवसापासून पाच बत्ती चौक येथे सातत्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन दुर्लक्षितपणे ठेकेदाराकडून काम करताना लिकेज होऊन अक्षरशः लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असताना नागरिकांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारची अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन अधिकार ग्रहाच्या समोर सुद्धा यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे काम करत असताना तुटल्यानंतर पिण्याचे पाणी वाया गेल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले होते तसेच महात्मा फुले चौक येथे याच पद्धतीमुळे बऱ्याच वेळा पाणी वाया गेले होते. तरीसुद्धा ठेकेदार काम करत असताना गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.
तिथे काम चालू असणारे ठेकेदाराचे कर्मचारी मात्र खुशाल याच्याकडे डोळे झाक करून आपल्याकडून काही झाले नाही अशा अविर्भावात आपले काम मात्र करताना आढळून येत होते.
तेथील स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर तातडीने हे वाया जात असणारे रस्त्यावरचे पाणी बंद करण्यात आले.
याबाबत पाणीपुरवठा समितीचे सभापती श्री. राहुल निंबाळकर नगरसेवक यांनी तातडीने ठेकेदार शी संपर्क करून खडे बोल सुनावले, आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि इथून पुढे अशा प्रकारचे दुर्लक्षित काम करू नका म्हणून नागरिकांच्या वतीने गांभीर्याने दखल घेऊन सांगण्यात आले आहे.
मागील दोन वर्षापासून या ठेकेदाराबाबत नागरिक नाराज असून नेहमीच प्रत्येक ठिकाणी नागरिकांना गैरसोय निर्माण करण्याचा प्रयत्न करत काम करत असताना नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन अशा प्रकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर पाय बंद घालावा अशी मागणी आता नागरिक करताना दिसून येत आहेत.
फलटण नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू असून अशा प्रकारच्या ठेकेदाराच्या या गलथान कारभाराबाबत मात्र फलटण शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
