राज महाराष्ट्र टाईम्स
search

हर्षदा देशमुख (जाधव) यांचा विजय भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

हर्षदा देशमुख (जाधव) यांचा विजय भाजपसाठी आत्मचिंतनाचा विषय
“

वडिलांना आमदारकीच्या विजयासाठी दिली होती हुलकावणी, लेकीने मात्र मारली बाजी.

💥 राज महाराष्ट्र टाइम्स.

फलटण.


महाराष्ट्राच्या राजकारणात आणि विशेषता पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणाचा रंगमंचावर सातारा जिल्हा सातत्याने राजकीय चर्चेत अग्रेसर आणि लक्षवेधी राहिला आहे.

यास सातारा जिल्ह्यातील सध्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचा माण-खटाव विधानसभा मतदारसंघ म्हटला की, पश्चिम महाराष्ट्रात आक्रमक तरुण तडफदार आणि या दुष्काळी मतदारसंघाचा सर्वाभिमुख विकासासाठी सक्रिय असणारे नेते आणि भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांचे नाव आघाडीवर येते.

त्यांच्या या मतदार संघात किती झालेल्या राजकीय वर्चस्वाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एक अचूक आणि हुकमी रणनीती आखल्याचे आताचा विधान परिषदेच्या निकालानेस्पष्ट होत आहे.

माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी यापूर्वीच गोरेंना विधानसभा निवडणुकीत तगडी लढत दिली होती, आणि आता त्यांच्या कन्येने थेट विधान परिषदेत बाजी मारत विरोधकांच्या छातीत धडकी भरवली आहे.

विधान परिषदेच्या या विजयाने मात्र आता राजकीय समीकरणावर विचार मंथन होण्याची वेळ आली आहे.


मागील भूतकाळातील संघर्ष पाहिला असता

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत प्रथमताच विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या प्रभाकर देशमुखांनी आमदार जयकुमार गोरेंना कडवी झुंज देऊन निवडणुकीत हार स्वीकारली असली तरी आणि तीही अवघ्या दोन ते तीन हजार अशा अल्पशा मतांच्या फरकाने गोरेंचा विजय झाला असला, तरी त्या निवडणुकीने माणखटावच्या राजकारणा बाबत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते.

प्रभाकर देशमुख यांनी नंतरच्या काळात

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत या मतदारसंघात परिपूर्ण अभ्यास करून आपल्या रणनीतीने महायुतीचा विजयाला ९ पैकी ५ जिल्हा परिषद गटांवर राष्ट्रवादीने कब्जा करत जयकुमार गोरेंना आपल्या राजकीय खेळीची चुणूक दाखवली. या राजकीय संघर्षात गोरेंच्या कुटुंबातील निकटवर्तीय सदस्यांनाही पराभव स्वीकारावा लागला ,

गोरेंचा मतदारसंघात असणारा राजकीय प्रभावाला हा संघर्ष धक्कादायक दिसून आला.


या विधान परिषदेच्या निवडणुकीत लेकीचा विजय लक्षवेधी.


पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत शरद पवार गटाने प्रभाकर देशमुख यांच्या कन्या हर्षदा देशमुख (जाधव) यांना उमेदवारी दिली. मागील काही वर्षांपासून संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत हर्षदा देशमुख जाधव यांनी पदवीधरांचे प्रश्न, नवीन नावनोंदणी आणि मतदारांशी संवाद, अशा कौशल्यपूर्ण संवादाने या निवडणुकीचा विजयाचा पाया भरभक्कम केला.

तर दुसरीकडे

स्मिता जाधव यांना भाजपने दिलेल्या उमेदवारीने पक्षातील अनेकांमध्ये नाराजी चा सुर होता.

आणि याच नाराजीचा फायदा महाविकास आघाडीला विजयाकडे घेऊन गेला .


हर्षदा देशमुख जाधव यांनीआपला विजय प्राप्त करून तब्बल एक लाखांहून अधिक मते आपल्या कडे खेचून आणण्यात यश मिळवले. या अभूतपूर्व विजयामुळे केवळ एका निवडणुकीपुरता हा विषय मर्यादित राहिलेला नाही, तर देशमुख कुटुंबाचे पश्चिम महाराष्ट्रातील मान खटाव मतदार संघातील राजकीय दबदबा निर्माण केला आहे.


आगामी माण खटाव मतदार संघाचे राजकारण भाजपसाठी आत्मचिंतन.


स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते थेट पदवीधर मतदारसंघापर्यंत प्रभाकर देशमुखांच्या कुटुंबाने मिळवलेले यश जयकुमार गोरेंसाठी मोठे आव्हान असणारआहे. एका बाजूला भाजपची सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात वाढलेली ताकद, तर दुसऱ्या बाजूला पवारांच्या मार्गदर्शनाखाली देशमुख कुटुंबाने उभी केलेली भक्कम राजकीय फळी यामुळे आगामी विधानसभा आणि स्थानिक निवडणुकांमध्ये हा सामना आणखी रंगतदार होणार यात शंका नाही. वडिलांना मिळालेल्या आमदारकीच्या अपयशाने आता लेकीने मात्र मैदानात बाजी मारल्याने माण-खटावच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांची सुरुवात पुढील काळासाठी सर्वांनाच विचार करण्यास भाग पाडणार आहे.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

निकृष्ट खावा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले ,दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी.
आरोग्य

निकृष्ट खावा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले ,दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी.

फलटण जि. सातारा, येथे बालाजी स्वीट्स आणि योगेश गाणबोटे,यांनानिकृष्ट खावा विक्री बाबत दीड लाखाचा दंड,
आरोग्य

फलटण जि. सातारा, येथे बालाजी स्वीट्स आणि योगेश गाणबोटे,यांनानिकृष्ट खावा विक्री बाबत दीड लाखाचा दंड,

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा या जगातील सर्वात लहान नगरसेविका
राजकीय

फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा या जगातील सर्वात लहान नगरसेविका

ANCHOR AD SLOT