राज महाराष्ट्र टाईम्स
search

निकृष्ट खावा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले ,दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी.

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

निकृष्ट खावा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले ,दुकान बंद करण्याची नागरिकांची मागणी.
“

बालाजी स्वीट आणि गाणबोटे मिल्क यांच्यावरील संयुक्त कारवाईनंतर फक्त दंडात्मक कारवाई पुरेशी नाही, दुकान बंद करा अशी नागरिकांची मागणी.

निकृष्ट खवा विक्री प्रकरणी फलटण शहर हादरले.

नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर.

💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥💥.


फलटण. फलटण शहरात असणाऱ्या बालाजी स्वीट आणि गाणबोटे मिल्क यांच्यावर निकृष्ट खवा विक्री बाबत संयुक्त कारवाई करून दीड लाख रुपयाचा दंड संबंधित प्रशासनाने 22 सप्टेंबर 2026 रोजी आदेशानुसार केला आहे.

नागरिकाच्या आरोग्याशी संबंधित असणाऱ्या या समस्येबाबत मात्र नागरिकांनी संताप व्यक्त केला असून फलटण शहरात या स्वीट होमच्या बाबत या अगोदरही बऱ्याचशा तक्रारी ग्राहकांच्या होत्या आणि अजूनही आहेत. या स्वीट होम मध्ये फक्त पदार्थांची विक्री केली जाते, आणि पदार्थ मात्र दुसऱ्या ठिकाणी बनवले जातात त्यामुळे पदार्थ बनवले जातात त्या ठिकाणची स्वच्छता आणि नियमानुसार सर्व अटी आणि शर्तीचे पालन होते का हे तपासणी गरजेचे असून अशा प्रकारची नागरिकांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या समस्या बाबत अशा प्रकारची दुकाने कायमस्वरूपी बंद करण्यात यावी अशी संतप्त भावना आता फलटणकर नागरिक व्यक्त करत आहेत.

वास्तविक पाहता खवा हा मिठाई बनवण्यासाठी लागणारा प्रमुख घटक असून मिठाईचे विविध प्रकार या खव्यापासूनच बनतात परंतु खवा जर निकृष्ट पद्धतीचा असेल तर मिठाई पण त्याच निकृष्ट प्रतीची असणार हे निश्चित झाल्याने नागरिकांच्या मनात येथील अन्नपदार्थ बाबत अविश्वास निर्माण झाला आहे.

ग्राहकांच्या आरोग्याशी निगडित असणाऱ्या अशा बाबींमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड नसावी ,आणि अन्न सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पालन करणे सर्व स्वीट होम ने गरजेचे आहे असे दिसून येत आहे.

नुकतेच फलटण शहरात महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या मिठाई विक्रेत्यांनी आपल्या व्यवसायाची आता फलटण शहरात पण सुरुवात केली आहे परंतु फलटण शहरात असणाऱ्या या स्वीट होम मध्ये बाहेरून येत असलेल्या मिठाईची गुणवत्ता आणि दर्जा सुद्धा आता संबंधित विभागाने तपासने गरजेचे आहे अशी वस्तुस्थिती निर्माण झाली आहे.

याबाबत संबंधित विभागाने फक्त दंडात्मक कारवाई पुरते मर्यादित न राहता कठोर कारवाई करून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर असलेला हा प्रश्न ताबडतोब सोडवावा अशी रास्त मागणी नागरिकांच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात येत आहे.

विशेषतः ज्येष्ठ नागरिक आणि बालकांना अशा निकृष्ट पतीच्या मिठाई मुळे वादा होऊन त्यांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होताना दिसून येत आहे.

याबाबत मिठाई विक्री करणाऱ्या विक्रेत्याने ग्राहकांना मिठाईबाबत आणि मिठाईच्या उत्पादनाच्या बाबतची विश्वास पूर्ण माहिती न देता तसेच स्वच्छतेबाबत सतर्क राहून ग्राहकांचा आरोग्याचा प्रश्न गंभीर होऊ देऊ नये अशी सतर्कता पाळणे गरजेचे आहे अन्यथा अशी दुकाने बंद झालेली बरी ही जनभावना आज फलटण शहर आणि तालुक्यात दिसून येत आहे.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

फलटण जि. सातारा, येथे बालाजी स्वीट्स आणि योगेश गाणबोटे,यांनानिकृष्ट खावा विक्री बाबत दीड लाखाचा दंड,
आरोग्य

फलटण जि. सातारा, येथे बालाजी स्वीट्स आणि योगेश गाणबोटे,यांनानिकृष्ट खावा विक्री बाबत दीड लाखाचा दंड,

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
गुन्हेगारी

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा शेतकऱ्यां साठी दिलासादायक निर्णय.
कृषी

महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा शेतकऱ्यां साठी दिलासादायक निर्णय.

ANCHOR AD SLOT