माझे प्रेरणास्थान माझा आदर्श माझी आई प्रा. डॉ. सौ. वैशाली शिंदे.
(पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या 2026 च्या अपक्ष उमेदवार.)
💥💥💥💥💥
🏵️अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तो
महाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।
विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं✡️
आईसह संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून, हिंदू धर्मातील वैराग्य अवस्थेतील सर्वोच्च पदावरती विराजमान असताना शंकराचार्य म्हणतात की, “मी आईशिवाय सदा अनाथ, दरिद्री, जीर्ण, रोगी, अत्यंत दिन दुबळा, विपत्तीने ग्रासलेला आहे”. यावरून आपल्याला समजू शकते की आपल्या जीवनामध्ये आईचे महत्व किती अनन्य साधारण आणि महान आहे.
*गोल्डन ड्रीम्स ही संस्था चालवत असताना माझी आई डॉ. वैशाली शिंदे ती अगदी दुर्गादेवीच्या रूपामध्ये जाणवते*. कदाचित दुर्गादेवीचे मूर्तिमंत रूपच असते, अशी जाणीव माझ्या अंतरी होते. असे म्हटले तरी अतिशोक्ती ठरणार नाही कारण माझी आई शिक्षणाचा प्रसार करत असताना सरस्वतीच्या रूपामध्ये देवताअसते, संपूर्ण शाळेचे आर्थिक नियोजन करताना ती लक्ष्मीच्या रूपामध्ये देवता असते, समाजाचे संरक्षण करताना महिषासुर मर्दिनीच्या रूपामध्ये देवता असते.
संकटाच्या काळात संपूर्ण कुटुंबाला धीर देते, तेव्हा ती दुर्गेचे रूप धारण करते, आणि जेव्हा ती आपल्या लेकरांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, तेव्हा साक्षात पार्वतीची माया तिच्या स्पर्शातून जाणवते.
माझ्या आईचे जीवन म्हणजे संघर्षातून यशाकडे जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. तिच्या वाट्याला प्रारंभापासूनच अनंतअडचणी आल्या, तरी त्या अडचणींना तिने कधीही आपल्या ध्येयापेक्षा मोठे होऊ दिले नाही. दिराने त्या समस्यांचा सामना केला, ती थकते, पण थांबत नाही; ती संकटांना सामोरी जाते, पण हार मानत नाही; ती स्वतःच्या वेदना मनात ठेवते, पण इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न कधी सोडत नाही. म्हणूनच माझ्यासाठी ती केवळ आई नसून धैर्य, त्याग आणि आत्मविश्वासाची जिवंत मूर्ती आहे. म्हणूनच माझ्या जीवनामध्ये माझी आई ही माझी मातृदेवता माझा सर्वोच्च गुरु आहे. तिच्या अनंत उपकारातून आणि कर्तुत्वाच्या सामर्थ्यातून मला बराच बोध प्राप्त करता आला.
आणि या बोधाच्या सामर्थ्याने माझ्या मातृदेवतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझ्या आयुष्याचे सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी तिचे ध्येय तिची प्रेरणा, तिचा आत्मविश्वास, तिचं सामर्थ्य, तिची धडाडी, तिची चिकाटी, तिचे सामाजिक सेवेचे व्रत, शैक्षणिक क्षेत्रातील तिची आस्था सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारीची जाणीव नक्कीच मला माझ्या आयुष्याचं सोनं करण्याची संधी देणार आहे असा माझा ठाम आत्मविश्वास आहे.
चैतन्य शिंदे फलटण. जिल्हा सातारा