राज महाराष्ट्र टाईम्स
search

श्री सद्गुरु हरी बाबांचा 186 वा प्रगट दिन व रथउत्सव सोहळा फलटण येथे प्रारंभ.

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्री सद्गुरु हरी बाबांचा 186 वा प्रगट दिन व रथउत्सव सोहळा फलटण येथे प्रारंभ.
“

मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2020 ते शुक्रवार दिनांक 23 ऑक्टोबर 2026 विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन व रथाची फलटण शहरात नगरप्रदक्षिणा, संपूर्ण महाराष्ट्रातील भक्तगणांची उपस्थिती.

श्री सद्गुरु हरीबाबांचा 186 वा प्रगट दिन व रथोत्सव सोहळा फलटण येथे प्रारंभ.


💥राज महाराष्ट्र टाइम्स. 💥💥


फलटण. संपूर्ण फलटण तालुक्याचे आणि विशेषतः संपूर्ण महाराष्ट्रभर असणाऱ्या भक्तगणांचे श्रद्धास्थान श्री. सद्गुरु हरीबाबा महाराज यांचा 186 वा प्रगट दिन व रथउत्सव सोहळा मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2026 विजयादशमी च्या दिवशी प्रारंभ होऊन या सोहळ्यामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मंगळवार दिनांक 20 ऑक्टोबर 2026 रोजी श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते रथ पूजन होऊन ओम दत्त चिले ओम भजनी मंडळाची भजन व भारूड सेवा पार पडली.


💥 बुधवार दिनांक 21 ऑक्टोबर 2026 रोजी श्रींचा महा अभिषेक होऊन श्री हरि चरित्राचे श्री चंदूकाका वादे यांनी वाचन करून आरती करण्यात आली,

दुपारी लीलावती महिला भजनी मंडळ यांची भजन सेवा व ह. भ. प. दशरथ महाराज फडतरे धुमाळवाडी यांची प्रवचन सेवा होऊन रात्री महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कलाकार विनोदी भारुड सम्राट ह. भ. प. श्री. चंद्रकांत बर्गे महाराज व सहकार यांचे अप्रतिम भारुड कार्यक्रम संपन्न झाला.

💥

गुरुवार दिनांक 22 10 2026 रोजी श्रींचा महा अभिषेक होऊन पंचक्रोशीतील सांप्रदायिक भजनी मंडळाची भजन सेवा तसेच नामवंत भजनी मंडळाची सेवा व वीरशैव भजनी मंडळ लिंगायत महिला भजनी मंडळ फलटण श्री दुर्गामाता महिला भजनी मंडळ कोळकी व श्री अंकुश महाराज

इवरे ,टाकळवाडा यांचे प्रवचन आणि कॅसेट फेम चित्रपट फेम श्री साई समर्थ भजनी मंडळ विक्रम नगर कोल्हापूर यांची भजन सेवा आयोजित करण्यात आली आहे.


💥 शुक्रवार 23 ऑक्टोबर 2026 रोजी श्रींचा प्रकट दिन व रथाची नगर प्रदक्षिणा💥

शुक्रवारी सकाळी महा अभिषेक होऊन सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी विचारधारांचे प्रस्थान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते पूजन होऊन सर्व विश्वस्तांच्या व भाविकांच्या उपस्थितीत नगरप्रदृष्टीने सुरुवात होणार आहे. नगर प्रदक्षिणेचा मार्ग श्रींचे मंदिरापासून उघडा मारुती मंदिर शिवाजी महाराज पुतळा उपळेकर काका मंदिर शिंपी गल्ली श्रीराम मंदिर गजानन चौक शुक्रवार पेठ शंकर मार्केट बुरुड गल्ली ते श्रींचे मंदिर असे नियोजन करण्यात आले आहे. सायंकाळी सात वाजता श्रींचे मंदिरात आरती व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.

श्री सद्गुरु हरीबाबा महाराज यांचा भक्तगण संपूर्ण महाराष्ट्रभर असून श्रींच्या प्रगट दिना दिवशी संपूर्ण महाराष्ट्रातून भाविक भक्त श्रींच्या दर्शनासाठी येत असतात दरवर्षी हा सोहळा फलटणकर मोठ्या उत्साहाने आणि भक्तिभावाने साजरा करत असतात.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

जैन सोशल ग्रुप च्या वतीने नगरसेविका कुमारी सिद्धांली शहा व सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार
सामाजिक

जैन सोशल ग्रुप च्या वतीने नगरसेविका कुमारी सिद्धांली शहा व सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर काटकसरीने करावा जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशालीताई कांबळे यांचे नागरिकांना आवाहन.
सामाजिक

दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर काटकसरीने करावा जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशालीताई कांबळे यांचे नागरिकांना आवाहन.

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या
गुन्हेगारी

अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या

ANCHOR AD SLOT