राज महाराष्ट्र टाईम्स
search

ॲड. संदीप कांबळे यांची सातारा जिल्हा युवासेना गड किल्ले संवर्धन कक्ष अध्यक्षपदी निवड

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

ॲड. संदीप कांबळे यांची सातारा जिल्हा युवासेना गड किल्ले संवर्धन कक्ष अध्यक्षपदी निवड
“

सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान.

राज महाराष्ट्र टाइम्स.

फलटण. फलटण येथील शिवसेनेचे युवा नेते ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांची युवा सेना गड किल्ले संवर्धन कक्ष सातारा जिल्हा अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने निवड करण्यात आली.

सातारा येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तरुण पिढीला आत्मसात करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली.

या निवडीबद्दल बोलताना ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांनी सांगितले की युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दर्शविलेल्या विश्वासाच्या प्रती मी शिवसेनेच्या संघटन बांधणीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार माननीय मुख्यमंत्री साहेबांची पक्षाच्या बाबतची असणारी संघटनात्मक बांधणी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमातून मी प्रयत्न करणार असून आपला सातारा जिल्हा हा गड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कार्याची सुरुवात माझ्या घरापासून माझ्या गावापासून म्हणजेच फलटण शहराजवळ असणाऱ्या संतोषगड आणि वारुगड या किल्ल्यापासून करणार आहे.

सकारात्मक विचाराच्या तरुणांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी पण मी बळकट प्रयत्न करणार असून लवकरच याबाबत माझ्या कार्यास सुरुवात करत आहे.

या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील तरुणांना सहभागी करून शिवसेना पक्षाचे विचार तळागाळात पोचवण्याचे काम करणार आहे.

माननीय नामदार पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रदान करताना शिवसेना पक्षाचे श्री धनंजय साळुंखे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना गड किल्ले संवर्धन कक्ष सचिव, श्री संभाजी पाटील सातारा जिल्हाध्यक्ष युवासेना तसेच भूषण वर्पे युवा सेना प्रमुख सातारा यांची प्रमुख उपस्थिती होती.

फलटण तालुक्यात कट्टर युवा शिवसैनिकाला संधी दिल्याबद्दल सर्वत्र ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांचे अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

ANCHOR AD SLOT