राज महाराष्ट्र टाईम्स
search

स्मार्ट ग्राम पंचायत जाधववाडी (फलटण )चा कचरा निर्मूलनाचा भोंगळ कारभार

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

स्मार्ट ग्राम पंचायत जाधववाडी (फलटण )चा कचरा निर्मूलनाचा भोंगळ कारभार
“

कचराकुंडीतून कचरा रस्त्यावर ग्रामपंचायत हाकेच्या अंतरावर आणि सातारा जिल्हा परिषद चे घोषवाक्य (पर्यावरण पूरक सातारा, निरोगी सातारा, स्वच्छ सातारा,) फक्त बॅनरवरच. ? त्वरित स्वच्छता व्हावी नागरिकांची मागणी

💥राज महाराष्ट्र टाइम्स. 💥💥


फलटण (जाधव वाडी)

फलटण शहराला लागून असणाऱ्या स्मार्ट ग्रामपंचायत जाधव वाडी म्हणून ओळखणाऱ्या ग्रामपंचायतचा कचरा कुंड्यांचा कचरा निर्मूलनाचा प्रश्न आता दिवसेंदिवस गहण होत असून नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाल्याचे दिसून येत असून गिरवी नाका ते विंचुरणी रस्त्यावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर असणारी कचराकुंडी तून कचरा रस्त्यावर बाहेर येऊन पडला तरी उचलला जात नाही उलट तो जाळून त्याला आग लावण्यात येत आहे. रात्री लागलेल्या कचराकुंडीच्या आगीला फलटण नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने जाऊन त्वरित विझवले व वाहतुकीस धुराचा होत असणारा अडथळा दूर केला. तरी सुद्धा अजूनही 13 ऑक्टोबर दिवसभर कचराकुंडीतून धूर निघतच आहे.

तर ग्रामपंचायतच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कचराकुंडीचा रस्ता फलटण गिरवी रस्त्यावर दुरावस्थेत पडलेला असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी आणि त्या रस्त्याने करणारे पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांच्या निदर्शनास येत असून सुद्धा डोळे झाक करत आहेत .यामुळे जाधववाडी येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. याबाबत त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. पंचायत समिती फलटण आणि सातारा जिल्हा परिषद प्रशासन यांनी गांभीर्याने दखल घेऊन या गावच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी नागरिक पुन्हा पुन्हा करत आहेत.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

ANCHOR AD SLOT