राज महाराष्ट्र टाइम्स
फलटण : फलटण शहरातील सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले अहद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेहबूब भाई
मेटकरी मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र, उत्सवासाठी होणारा खर्च सामाजिक व धार्मिक कार्यासाठी उपयोगी आणण्याचा निर्णय अहद सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेहबूब मेटकरी व संस्थेच्या उपाध्यक्षा कुमारी राजीया मेहबूब मेटकरी यांनी घेतला आहे.
रविवार पेठ, मेटकरी गल्ली येथे नियोजित गणपती मंदिराच्या उभारणीसाठी दहीहंडी उत्सवासाठी करण्यात येणारा तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च देण्याची घोषणा मेहबूब मेटकरी व राजीया मेटकरी यांनी केली या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.
मेहबूब मेटकरी हे अहद सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. कोरोना काळात गरजू व गोरगरीब नागरिकांना किराणा किटचे वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन, शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप यांसह विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत.
रविवार पेठ येथील तालीममध्ये व्यायामाचे धडे घेतल्याने तालमी चा लाल मातीचे ऋण फेडण्यासाठी
काहीतरी देणे लागते, या भावनेतून रविवार पेठ येथील इच्छापूर्ती गणपती मंदिरासाठी शेकडो सिमेंटच्या पोत्यांचे दान करण्याचे कामही मेहबूब मेटकरी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या
मेहबूब मेटकरी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या उच्चशिक्षित कन्या कुमारी राजीया मेटकरी यांचा २०२६ च्या फलटण नगरपालिका निवडणुकीत निसटता पराभव झाला. मात्र, या पराभवाने खचून न जाता मेहबूब भाई मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आपल्या प्रभागात सामाजिक कार्य प्रभावीपणे करत आहेत.
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार सचिन कांबळे-पाटील तसेच फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मेहबूब मेटकरी व राजीया मेटकरी यांनी प्रभागातील विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. याची दखल घेऊन नगराध्यक्ष समशेर सिंह यांनी फलटण शहरातील वैद्यकीय सेवेची जबाबदारी त्यांच्यावर दिली. मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी, गल्लीतील रस्त्यांसाठी तसेच नवदीप गणेशोत्सव मंडळाच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. यापैकी काही कामे सुरू झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.
सामाजिक कार्यासोबतच विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या मेहबूब मेटकरी व राजीया मेटकरी यांच्या कार्याचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.
दरम्यान, आगामी काळात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने कुमारी राजीया मेटकरी यांना फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.