राज महाराष्ट्र टाईम्स
search

पैलवान जयदीप गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा सामाजिक उपक्रम.

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

पैलवान जयदीप गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा सामाजिक उपक्रम.
“

सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून सामाजिक ऋणातून मुक्त होण्यासाठी वाढदिवसानिमित्त पैलवान जयदीप गायकवाड यांचा ज्येष्ठासाठी स्तुत्य उपक्रम.

पैलवान जयदीप गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर चा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम.


राज महाराष्ट्र टाइम्स.

फलटण तालुक्यातील वाखरी गावचा लाल मातीतला ग्रामीण भागातून कष्टाचा व जिद्दीच्या जोरावर घडलेला रांगडा पैलवान जयदीप गायकवाड चा आज वाढदिवस.


वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून ज्येष्ठांच्या सेवेसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करून फलटण तालुक्यातील ज्येष्ठांची सेवा करण्याचा मनोदय केला आहे. हे शिबिर वाखरी तालुका फलटण येथील भैरवनाथ मंदिर येथे रविवार दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारपर्यंत आयोजित केले आहे तरी या उपक्रमात सहभागी होऊन सेवेची संधी मिळावी असे विनम्र आवाहन पैलवान जयदीप यांनी केले आहे.


वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे होत आहे विशेष कौतुक.


पैलवान जयदीप यांना लहानपणापासूनच कुस्ती या खेळाबाबत विशेष आवड निर्माण झाली होती. वाखरी गावातील ग्रामस्थ आत्माराम मोहिते, रघुनाथ ढेकळे दयाराम शिंदे हनुमंत मोरे जगन्नाथ जाधव दादा ढेकळे पाटील अधिक ढेकळे पाटील रामभाऊ ढेकळे पाटील माऊली शिंदे धनंजय गरड मुगुटराव ढेकळे पाटील या ग्रामस्थांनी पुत्रवत प्रेम करून या रांगड्या पैलवानाचा नावलौकिक होण्यासाठी त्याचे मनोबल वाढवून वाखरी गावाचे आणि तालुक्याचे नावलौकिक होण्यासाठी अथक प्रयत्न करून एक चांगला पैलवान घडवला.

या जडणघडणीत महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे यांचे पुत्र पैलवान निलेश लोखंडे या जिवलग मित्राची साथ पैलवान जयदीप ला बहुमोल ठरली.

महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गोंदिया भोसरी पुणे नागपूर अकलूज अहिल्यानगर वारजे पुणे रोहा रायगड मुंबई बालेवाडी आणि इतर सर्व शहरात कुस्तीमध्ये आपल्या कौशल्याची आणि खेळाची चुणूक दाखवून त्याने एक आदर्श पैलवान की चा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन हिंदकेसरी चॅम्पियन भारत अमेरिका कुस्ती पनवेल महापौर केसरी असे माना चे किताब पटकावून 41 गदाचा मानकरी असणारा वाखरी गावचा सुपुत्र पैलवान जयदीप कृष्णा गायकवाड याचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल, असा उल्लेखनीय कार्यभाग आपल्या क्षेत्रात पैलवान जयदीप ने केला आहे.


पैलवान जयदीप हा लहानपणापासूनच आज्ञाधारक शिस्त संयमी आणि शांत स्वभावाचा सर्वांच्या सूचनांचा मार्गदर्शनाचा आदर करून त्यांनी आपला नावलौकिक या क्षेत्रात घडवला.


पनवेल महापौर केसरी तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन भारत पाकिस्तान कुस्ती स्पर्धेत तसेच भारत अमेरिका कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन आपल्या खेळातील कला कौशल्याची चुणूक त्याने साता समुद्रा पार पण दाखवली. पैलवान की करत असताना कधीही इतर कोणत्याही गोष्टींमध्ये दुर्लक्ष करून आपल्या खेळावर प्रेम करून कष्ट व जिद्दीच्या जोरावर अतोनात मेहनत करून पैलवान जयदीप ने हे यश प्राप्त केले आहे. यामध्ये त्याला बऱ्याचदा संघर्षासाठी झगडावे लागले. काही वेळा मिळालेल्या यशामुळे द्वेष आणि मत्सराचा सुद्धा सामना करून आप्त स्वकीय यापासून सुद्धा त्याला त्रास सहन करावा लागला परंतु तिकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून थोरामोठ्यांचा आदर करून आणि त्यांचा आशीर्वादाने त्याने हे ध्येय प्राप्त केले आहे.


भावी पिढीत घडणाऱ्या पैलवानांसाठी एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. कोणत्याही गोष्टीने खचून न जाता आपल्या शांत संयमी स्वभावाने त्याने हे यशाचे शिखर प्राप्त केल्यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच आणि महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रात त्याच्याबद्दल प्रेम आणि आदर्श नेहमी दिसून येतो.

अशा या रांगड्या पैलवानाला फलटण तालुक्यातील जनतेच्या वतीने भावी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

ANCHOR AD SLOT