राज महाराष्ट्र टाईम्स
search

फलटण नगर परिषदेच्या संडे (एस एच जी एस)मार्ट ची राज्यस्तरावर दखल व विशेष प्रशंसा

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

फलटण नगर परिषदेच्या संडे (एस एच जी एस)मार्ट ची राज्यस्तरावर दखल व विशेष प्रशंसा
“

फलटण शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ मिळवण्यासाठी नगराध्यक्ष समशेर दादा यांचा अभिनव उपक्रम गणेश उत्सवानिमित्त 11,12,13,सप्टेंबर तीन दिवसीय संडे मार्ट.

राज महाराष्ट्र टाइम्स

🌟 फलटण नगर परिषदेच्या संडे SHGs मार्ट उपक्रमाची राज्य स्तरावर दखल! 🌟

फलटण शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजार मूल्य मिळवून देण्याच्या उद्देशाने फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नाने व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या विशेष सहकार्याने दर रविवारी फलटण नगर परिषदेच्या प्रांगणात या संडे मार्ट ची सुरुवात करण्यात आली.

मा. श्री. प्रसादराजे भोसले साहेब, राज्य अभियान व्यवस्थापक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA), नवी मुंबई, महाराष्ट्र शासन यांनी फलटण नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘संडे SHGs मार्ट’ या अभिनव उपक्रमाची विशेष प्रशंसा केली आहे.

महिला बचत गटांना स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारमूल्य मिळवून देणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची यशोगाथा केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.


या उल्लेखनीय उपक्रमाची यशोगाथा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत (Ministry of Housing & Urban Affairs) राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

ही बाब फलटण नगरपरिषद, महिला बचत गट तसेच संपूर्ण फलटण शहरासाठी अभिमानाची आणि गौरवाची असणार आहे..

या स्तुत्य उपक्रमाबाबत फलटण शहरातील महिला बचत गटाच्या वतीने फलटण नगरपरिषद आणि नगराध्यक्ष समशेर दादा व महिला बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका सौ. मोहिनी हेंद्रे . उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले, तसेच इतर नगरसेविका सौ. रूपाली सस्ते, सौ. सुपर्णा अहिवळे, नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा व सर्वच नगरसेविका आणि नगरसेवक यांचे आभार व्यक्त केले आहेत.

यावेळी महिला बचत गटातील या संडे मार्ट मध्ये भाग घेतलेल्या महिलांनी आभार व्यक्त करताना सांगितले की आमच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून दिल्यामुळे आमच्या अर्थार्जनासाठी नक्कीच आणि आमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत होत आहे.

नगराध्यक्ष समशेर दादांनी शहरातील इतर सर्व महिला बचत गटांना ही या संडे मार्ट मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे सर्वांनाच नगर परिषदेच्या वतीने विशेष सहकार्य आणि मदत केली जाईल असेही त्यांनी आवर्जून उल्लेख करताना सांगितले आहे.

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

संबंधित बातम्या

अधिक बातम्या पहा

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

ANCHOR AD SLOT