फलटण. श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळ फलटण चे संस्थापक अध्यक्ष युवा नेते श्री अमोल भैया निंबाळकर यांच्या श्री गणेशाच्या चरणी असलेल्या श्रद्धा आणि निष्ठेच्या माध्यमातून यावर्षी वर्ष 24 वे गणेशोत्सवाचे साजरे होत आहे यावर्षीचा उत्साह अत्यंत दिमागदार आणि सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. तरी या गणेश स्थापनेच्या दिवशी लालबागच्या राजाची विधीवत स्थापना करण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता महात्मा फुले चौक येथे स्थापनेच्या ठिकाणी हजर राहावे अशी विनंती श्री. अमोल भैया निंबाळकर संस्थापक अध्यक्ष व यावर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे आणि उपाध्यक्ष आसिफ बागवान यांनी केली आहे 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी भव्य हा पीच षटकार स्पर्धांचे आयोजन क्रिकेटपटू निंबराज निंबाळकर आणि सँडी साळुंखे यांनी आयोजन केले आहे. यामध्ये भव्य स्पर्धा होणार असून बक्षीस वितरण गणेशोत्सव कालात करण्यात येणार आहे
14 सप्टेंबर गणेश चतुर्थी दिवशी विधीवत स्थापना होणार आहे. आणि पारंपारिक मिरवणुकीने अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी 26 सप्टेंबर 2026 रोजी नीरा नदी येथे भिवाई मातेच्या असणाऱ्या डोहात विसर्जन पारंपारिक पद्धतीने होणार आहे.