कु शिवांजली भोसले* सभापती (प.स.) फलटण यांचा सांस्कृतिक उपक्रम. गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा २०२६
राज महाराष्ट्र टाइम्स.
*गणेशोत्सव 2026 च्या अनुषंगाने साखरवाडी पंचक्रोशीतील महिलांसाठी आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने आणि गृहिणी महिलां चा कल्पकतेला वाव देण्याच्या उद्देशाने व आपल्या कल्पकतेने आणि कलाकुसरीने गौरी-गणपतीची सुंदर आरास सजावट स्पर्धा महिलांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी या सांस्कृतिक उपक्रमातून निर्माण केली आहे.
*स्पर्धेमधील विजेत्यांसहित सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सुद्धा आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.
स्पर्धेविषयी
*महत्त्वाची सूचना :*
१) १७ तारखेपर्यंत स्पर्धकांची नोंदणी घेतली जाईल.
२) १८ व १९ तारखेला स्पर्धकांच्या गौरी-गणपती आरास सजावटीचे निरीक्षण करण्यात येईल.
*बक्षिसे :*
*🥇 प्रथम क्रमांक — ₹५५५५/- व सन्मानचिन्ह*
*🥈 द्वितीय क्रमांक — ₹४४४४/- व सन्मानचिन्ह*
*🥉 तृतीय क्रमांक — ₹३३३३/- व सन्मानचिन्ह*
*🏅 चतुर्थ क्रमांक — ₹२२२२/- व सन्मानचिन्ह*
*🎁 पाचवे विशेष ५ बक्षीस व ५ साड्या देण्यात येतील.*
*साखरवाडी-पिंपळवाडी, फडतर वाडी, होळ व जिंती* या ४ गावांतील महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी.
नोंदणी व व्हिडिओ पाठविण्यासाठी WhatsApp : *8830285954*
या WhatsApp नंबरवर आपल्या घरातील गौरी-गणपती सजावटीचे फोटो/व्हिडिओ पाठवावेत.
व्हिडिओसोबत खालील माहिती पाठवणे आवश्यक आहे:
*▫️ आपले संपूर्ण नाव*
*▫️ आपल्या गावाचे नाव*
*▫️ आपला संपूर्ण पत्ता*
या स्पर्धेच्या अनुषंगाने सभापती कुमारी शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले यांनी आवाहन केले आहे की✨ स्पर्धेत या चार गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आणि आपल्या कलाकुसरीला व्यासपीठ मिळवा! ✨
*कु. शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले*
*सभापती, पंचायत समिती फलटण*