फलटण. फलटण नगर परिषदेच्या वतीने शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादित विविध उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ निर्माण होण्यासाठी फलटण नगर परिषदेच्या वतीने दर रविवारी संडे एस एम जी मार्च सुरुवात करण्यात आली.
महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित झालेल्या मालांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा एक यशस्वी प्रयत्न नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे.
या शुभारंभाच्या दिवशीच फलटण शहरातील विविध बचत गटांनी आपल्या उत्पादित मालांचा स्टॉल फलटण नगर परिषदेच्या प्रांगणात उभा केला व या महाडचा शुभारंभ आमदार सचिन पाटील ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर तसेच शिवरूप राजे खर्डेकर उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ मोहिनी हेंद्रे सौ,नगरसेवक आणि नगरसेविका आणि फलटण शहरातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी आमदार सचिन पाटील यांनी प्रतिपादन केले की शहरातील सर्वच महिलांच्या बचत गटांनी या संडे मार्ट मध्ये सहभागी होऊन आपल्या उत्पादनांची विक्री करून सहभाग नोंदवावा तसेच इथून पुढे भविष्यकाळात यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक मदतीसाठी आम्ही सदैव सक्रिय राहू.
नगराध्यक्ष समशेर सिंहयांनी यावेळी बोलताना सांगितले की महिला बचत गटांसाठी नगरपरिषदेच्या वतीने सर्व नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वच बचत गटांना सहभागी करून एक वेगळ्या प्रकारची आठवड्याची हक्काची बाजारपेठ तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील.
यावेळी भाजपचे पदाधिकारी महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष सौ उषाताई राऊत सौ विजया कदम व इतर सर्व नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते.