राजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण झाल्याशिवाय मंडळाचा सत्काराचा हार आणि नारळ स्वीकारणार नाही.
नगराध्यक्ष समशेर दादांचा ठाम निर्णय.
राज महाराष्ट्र टाइम्स
फलटण.
दिनांक सात सप्टेंबर 2026 रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील उमाजी नाईक स्मारक येथे मंडळाच्या वतीने आयोजित केलेला अभिवादनाच्या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहून राजे उमाजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व नारळ अर्पण करून अभिवादन केले.
फलटण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष समशेर दादा यांच्या विशेष सहकार्याने राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे सुशोभीकरणा साठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. याबाबत मंडळाने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. परंतु नगराध्यक्ष समशेर दादा यांनी या सत्काराला स्पष्टपणे नकार देत निधी उपलब्ध केला आहेच परंतु जोपर्यंत स्मारकाचे सुशोभीकरण होत नाही तोपर्यंत राजे उमाजी नाईक मंडळाच्या वतीने मी कोणताही सत्कार स्वीकारणार नाही व सुशोभीकरन पूर्ण झाल्यावरच तुमचा सत्कार स्वीकारण्यात येईल असा ठाम निर्णय त्यांनी व्यक्त करून त्यावेळी निर्धार केला.
बऱ्याच वर्षापासून राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे प्रलंबित काम होते त्याला समशेर दादांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मंडळाच्या वतीने समशेर दादांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत.