राज महाराष्ट्र टाईम्स
search

श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या लालबागच्या राजाच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न

Raj Maharashtra Times

व्हॉट्सॲपवर बातमी शेअर करा

फोटो व माहितीसह शेअर करण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या लालबागच्या राजाच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न
“

प्रथम पारितोषक रु.10005 सस्तेवाडी क्रिकेट टीम हे पटकावले तर द्वितीय पारितोषिक 5005 कोळकी क्रिकेट टीम साठी

फलटण. श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळ फलटण यांच्यावतीने क्रिकेटपटू निमराज निंबाळकर व सँडी साळुंके मित्र परिवाराने आयोजित केलेल्या भव्य हा पीच षटकार स्पर्धा 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट 2026 रोजी फलटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या.

या झालेल्या स्पर्धेमध्ये सस्तेवाडी च्या क्रिकेट टीमने प्रथम क्रमांक पटकावून रोख बक्षीस रुपये 10005व ट्रॉफी प्राप्त केली तर द्वितीय क्रमांक कोळकी येथील क्रिकेट टीमने रोख बक्षीसरुपये 5005व ट्रॉफी पटकावली.

फलटण व जाधव वाडी येथे असणाऱ्या नामांकित आयडियल स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती वैशाली शिंदे यांच्या शुभहस्ते दोन्ही संघांना बक्षीस व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी या स्पर्धेमध्ये खेळलेल्या एकूण 18 संघांनी आपली उपस्थिती दर्शवून शेवटच्या मॅचचा थरार अनुभवला.

या बक्षीस वितरणाच्या वेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष फलटण तालुक्यातील युवा नेते आणि माझी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे श्री अमोल भैया निंबाळकर यांनी सांगितले की पूर्वीपासूनच आपल्या फलटण शहरात मागील चार-पाच पिढ्यापासून क्रिकेट हा खेळ अतिशय फलटण तालुक्याचा आवडीचा खेळ म्हणून ओळखला जातो यावेळच्या युवा पिढीने ही तोच वारसा पुढे जतन केला आहे आणि फलटण तालुक्यातून चांगले क्रिकेटपटू तयार होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचे आमच्या मंडळाच्या यावर्षीच्या 24व्या वर्षी पासून आम्ही पहिले पर्व सुरू केले आहे भविष्यात उत्कृष्ट क्रिकेटपटू तयार होण्यासाठी मंडळाच्या वतीने आमचे नवोदित खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य लाभणार आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी या वर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे सिव्हिल इंजिनिअर अँड कॉन्ट्रॅक्टर व जेष्ठ पत्रकार उपस्थित होते. यावर्षीचा उत्सव हा आगळावेगळा गणेशोत्सव असून पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या या वर्षीच्या मंडळाच्या महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती वैशाली शिंदे ऑडिओ स्कूल फलटण यांची नियुक्ती करण्यात आली या स्पर्धा संपन्न होण्यासाठी क्रिकेटपटू निंबराज निंबाळकर व त्यांच्या इतर सर्व मित्र परिवारांनी मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल फलटण शहरातील क्रिकेट प्रेमींच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक होत आहे

Raj Maharashtra Times

Raj Maharashtra Times

लेखक आणि पत्रकार. सामाजिक क्रांतीचे आणि व्यावहारिक विचारांचे प्रसारक.

ही बातमी शेअर करा

एक टिप्पणी द्या

राजपत्र दैनिक

तुमच्या ईमेलवर दररोज सर्वोत्तम बातम्या मिळवा.

नवीनतम अद्यतन

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)
सामाजिक

दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.)

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति  आदरयुक्त गौरवगाण .
सामाजिक

मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण .

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.
सामाजिक

शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे.

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील
प्रशासन

दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील

ANCHOR AD SLOT