
प्रधानमंत्री आवास योजना - शहरी अंतर्गत फलटण नगर परिषदेला 184 घरकुलांना मंजुरी व 1 कोटी 38 लक्ष रुपये घरकुल अनुदान मंजूर
केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी *"प्रधानमंत्री आवास योजना - शहरी PMAY-U"* अंतर्गत सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीसाठी फलटण नगरपरिषद क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
फलटण नगर परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली असून, योजनेअंतर्गत *एकूण 184 घरकुलांना मंजुरी* देण्यात आली आहे. घरकुलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वाट्याचे मिळून *एकूण 1 कोटी 38 लक्ष रुपये इतके अनुदान* देखील मंजूर झाले आहे.
या योजनेमुळे फलटण शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.
या मंजुरीबद्दल फलटण नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक यांनी शासनाचे आभार मानले असून, नगराध्यक्ष समशेर दादा यांनी नागरिकांना लवकरात लवकर घरकुलांचे बांधकाम सुरू करून घरकुल अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे .