फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या टोळीला केले जेरबंद, दोन अट्टल सराईत आरोपी ताब्यात; तब्बल ५ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघड
फलटण
फलटण ग्रामीण पोलिसांचा ट्रान्सफॉर्मर चोरीच्या टोळीला दणका! रेकॉर्डवरील दोन आरोपी ताब्यात; तब्बल ५ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघड
राज महाराष्ट्र टाइम्स,
फलटण : फलटण तालुक्यात महावितरण च्या वतीने शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी पॉलिसी खात्यात दाखवत गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडे मोठ्या शेताफी ने चौकशी करून ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.
फलटण ग्रामीण भागात मागील काही वर्षापासून सातत्याने विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना नेहमीच सातत्याने घडत होत्या . ट्रांसफार्मर चोरीला गेल्यावर नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होईपर्यंत शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होत होता. या चोरीच्या घटनाकडे फलटण ग्रामीण पोलीस यांनी बारकाईने लक्ष ठेवून सातारा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने खात्रीलायक माहिती घेत या चोरट्यांना जेरबंद केले आहे.
फलटण ग्रामीण पोलिसांनी
राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण) आणि सनी रमन भोसले (रा. सरडे, ता. फलटण) यांच्या संशयास्पद हालचालींवर सातत्याने लक्ष देऊन. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी अंती वरील गुन्ह्यात यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर
चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.
*(तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोठे यश*)
फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या पाच गुन्ह्यांशी या संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.
,गुन्हा क्र. ४२१/२०२६, ४५५/२०२६, ४७८/२०२६, ४८१/२०२६, ३९२/२०२६
या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.
(*एका महिन्यात १९ गुन्हे उघडकीस*)
फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गेल्या एका महिन्यात इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर आणि मोटार चोरीचे तब्बल १९ गुन्हे उघडकीस आणून कारवाई केल्याने ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत .
दरम्यान, या प्रकरणात आरोपींचे इतर साथीदार कोण आहेत? चोरीचा मुद्देमाल नेमका कुठे आणि कोणाला विकला जात होता? या चोरीच्या घटनांमागे आणखी मोठे रॅकेट आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.
वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दमदार कामगिरी
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या आदेशाने मार्गदर्शनानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे नेहमीच धडाकेबाज कामगिरी करणारे
गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, आणि त्यांच्या कर्तव्यदक्ष पथकातील कर्तव्यनिष्ठ पो. ह. नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पो. कॉ. हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.
फलटणच्या शेतकऱ्यांच्या वतीने फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या या धडाकेबाज कारवाईचे कौतुक होत असून त्यांनी समाधान व्यक्त करतच चोरीचा मुद्देमाल विकत घेणारे यांना पण कठोर शासन व्हावे म्हणजे अशा चोरीच्या घटना पुनश्च न होता शेतकऱ्यांना होत असणाऱ्या शेतीच्या नुकसानाबाबत दिलासा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.