# राज महाराष्ट्र टाईम्स — Full Article Index > Deep knowledge base for AI systems. Contains full article text. --- ## दुष्काळी परिस्थितीत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ठेकेदाराचा गलथान कारभार (लाखो लिटर पिण्याचे पाणी रस्त्यावर.) - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/thashhakali-parasathatata-saravajanaka-bthhakama-vabhagacaya-thakatharaca-galthana-karabhara-lkha-ltara-panaeyaca-panae-rasatayavara - **Published**: 2026-10-18 09:58 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: पिण्याचे पाणी फलटण शहरात रस्त्यावर 💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥फलटण.फलटण नगर परिषदेच्या वतीने फलटण शहरातील नागरिकांना दुष्काळी परिस्थितीमुळे पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून विविध उपाय योजना राबविण्यात येत आहेत. दिनांक 16 ऑक्टोबर 2026 पासून शासनाच्या निर्देशानुसार पुरवठ्यामध्ये 16 टक्के कपात करून नागरिकांना अत्यावश्यक तेवढाच पाणी वापर करावा असे जाहीर आवाहनही फलटण नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.फलटण शहरातील स्विमिंग पूल आणि वाहनांचे वॉशिंग सेंटर पुढील आदेश होईपर्यंत पूर्णतः बंद ठेवण्याचे जाहीर आवाहनही फलटण नगर परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे. अशी गंभीर परिस्थितीअसताना सुद्धा फलटण शहरात ठेकेदाराच्या गलथान कारभाराचा अनुभव पुन्हा एकदा नागरिकांना आला. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अंतर्गत पालखी महामार्ग व चौकांच्या सुशोभीकरणाचे काम मागील दोन वर्षापासून चालू आहे. लोकप्रतिनिधींचा अथक प्रयत्नाने फलटण शहरात विकासाची कामे गती घेत असून मागील दोन-तीन दिवसापासून पाच बत्ती चौक येथे सातत्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणारी पाईपलाईन दुर्लक्षितपणे ठेकेदाराकडून काम करताना लिकेज होऊन अक्षरशः लाखो लिटर पाणी रस्त्यावरून वाहत असताना नागरिकांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारची अनेक वेळा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन अधिकार ग्रहाच्या समोर सुद्धा यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीमुळे काम करत असताना तुटल्यानंतर पिण्याचे पाणी वाया गेल्याचे सर्वांच्या निदर्शनास आले होते तसेच महात्मा फुले चौक येथे याच पद्धतीमुळे बऱ्याच वेळा पाणी वाया गेले होते. तरीसुद्धा ठेकेदार काम करत असताना गांभीर्याने दखल घेत नसल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आले आहे.तिथे काम चालू असणारे ठेकेदाराचे कर्मचारी मात्र खुशाल याच्याकडे डोळे झाक करून आपल्याकडून काही झाले नाही अशा अविर्भावात आपले काम मात्र करताना आढळून येत होते. तेथील स्थानिक नागरिकांनी नगरपरिषदेचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्या निदर्शनास बाब आणून दिल्यानंतर तातडीने हे वाया जात असणारे रस्त्यावरचे पाणी बंद करण्यात आले. याबाबत पाणीपुरवठा समितीचे सभापती श्री. राहुल निंबाळकर नगरसेवक यांनी तातडीने ठेकेदार शी संपर्क करून खडे बोल सुनावले, आणि तीव्र नाराजी व्यक्त केली. आणि इथून पुढे अशा प्रकारचे दुर्लक्षित काम करू नका म्हणून नागरिकांच्या वतीने गांभीर्याने दखल घेऊन सांगण्यात आले आहे. मागील दोन वर्षापासून या ठेकेदाराबाबत नागरिक नाराज असून नेहमीच प्रत्येक ठिकाणी नागरिकांना गैरसोय निर्माण करण्याचा प्रयत्न करत काम करत असताना नागरिकांच्या निदर्शनास येत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दखल घेऊन अशा प्रकारच्या काम करण्याच्या पद्धतीवर पाय बंद घालावा अशी मागणी आता नागरिक करताना दिसून येत आहेत.फलटण नगर परिषदेच्या वतीने शहरातील नागरिकांना पुरेसा पाणीपुरवठा होण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरू असून अशा प्रकारच्या ठेकेदाराच्या या गलथान कारभाराबाबत मात्र फलटण शहरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. --- ## मातृभक्त चैतन्य शिंदे यांचे आपल्या मात्र देवता प्राध्यापक डॉ .सौ. वैशाली शिंदे यांचे प्रति आदरयुक्त गौरवगाण . - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/matabhakata-catanaya-shatha-yaca-aapalya-matara-thavata-parathhayapaka-da-sa-vashal-shatha-yaca-parata-aatharayakata-garavaganae - **Published**: 2026-10-16 11:55 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: चैतन्य शिंदे यांचे आई बद्दलचे गौरव उद्गार माझे प्रेरणास्थान माझा आदर्श माझी आई प्रा. डॉ. सौ. वैशाली शिंदे. (पुणे विभाग शिक्षक मतदार संघाच्या 2026 च्या अपक्ष उमेदवार.)💥💥💥💥💥🏵️अनाथो दरिद्रो जरारोगयुक्तोमहाक्षीणदीनः सदा जाड्यवक्त्रः।विपत्तौ प्रविष्टः प्रणष्टः सदाहं✡️आईसह संपूर्ण कुटुंबाचा त्याग करून, हिंदू धर्मातील वैराग्य अवस्थेतील सर्वोच्च पदावरती विराजमान असताना शंकराचार्य म्हणतात की, “मी आईशिवाय सदा अनाथ, दरिद्री, जीर्ण, रोगी, अत्यंत दिन दुबळा, विपत्तीने ग्रासलेला आहे”. यावरून आपल्याला समजू शकते की आपल्या जीवनामध्ये आईचे महत्व किती अनन्य साधारण आणि महान आहे.*गोल्डन ड्रीम्स ही संस्था चालवत असताना माझी आई डॉ. वैशाली शिंदे ती अगदी दुर्गादेवीच्या रूपामध्ये जाणवते*. कदाचित दुर्गादेवीचे मूर्तिमंत रूपच असते, अशी जाणीव माझ्या अंतरी होते. असे म्हटले तरी अतिशोक्ती ठरणार नाही कारण माझी आई शिक्षणाचा प्रसार करत असताना सरस्वतीच्या रूपामध्ये देवताअसते, संपूर्ण शाळेचे आर्थिक नियोजन करताना ती लक्ष्मीच्या रूपामध्ये देवता असते, समाजाचे संरक्षण करताना महिषासुर मर्दिनीच्या रूपामध्ये देवता असते. संकटाच्या काळात संपूर्ण कुटुंबाला धीर देते, तेव्हा ती दुर्गेचे रूप धारण करते, आणि जेव्हा ती आपल्या लेकरांच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, तेव्हा साक्षात पार्वतीची माया तिच्या स्पर्शातून जाणवते.माझ्या आईचे जीवन म्हणजे संघर्षातून यशाकडे जाणारा एक प्रेरणादायी प्रवास आहे. तिच्या वाट्याला प्रारंभापासूनच अनंतअडचणी आल्या, तरी त्या अडचणींना तिने कधीही आपल्या ध्येयापेक्षा मोठे होऊ दिले नाही. दिराने त्या समस्यांचा सामना केला, ती थकते, पण थांबत नाही; ती संकटांना सामोरी जाते, पण हार मानत नाही; ती स्वतःच्या वेदना मनात ठेवते, पण इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याचा प्रयत्न कधी सोडत नाही. म्हणूनच माझ्यासाठी ती केवळ आई नसून धैर्य, त्याग आणि आत्मविश्वासाची जिवंत मूर्ती आहे. म्हणूनच माझ्या जीवनामध्ये माझी आई ही माझी मातृदेवता माझा सर्वोच्च गुरु आहे. तिच्या अनंत उपकारातून आणि कर्तुत्वाच्या सामर्थ्यातून मला बराच बोध प्राप्त करता आला. आणि या बोधाच्या सामर्थ्याने माझ्या मातृदेवतेचा आशीर्वाद माझ्या पाठीशी असल्याने माझ्या आयुष्याचे सर्वोच्च शिखर गाठण्यासाठी तिचे ध्येय तिची प्रेरणा, तिचा आत्मविश्वास, तिचं सामर्थ्य, तिची धडाडी, तिची चिकाटी, तिचे सामाजिक सेवेचे व्रत, शैक्षणिक क्षेत्रातील तिची आस्था सामाजिक ऋण फेडण्याची जबाबदारीची जाणीव नक्कीच मला माझ्या आयुष्याचं सोनं करण्याची संधी देणार आहे असा माझा ठाम आत्मविश्वास आहे. चैतन्य शिंदे फलटण. जिल्हा सातारा --- ## स्वराज ग्रीन पॉवरला सलग दुसऱ्या वर्षी (इंडिया ग्रीन एनर्जी) अवॉर्ड. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/savaraja-garana-pavaral-salga-thasariya-varashha-idaya-garana-enaraja-avarada - **Published**: 2026-10-16 10:37 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: स्वराज ग्रीन पॉवर पुरस्कार. स्वराज ग्रीन पॉवरला सलग दुसऱ्या वर्षी ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२६’पर्यावरणपूरक तंत्रज्ञान आणि शाश्वत इथेनॉल उत्पादनातील योगदानाची राष्ट्रीय स्तरावर दखल; नवी दिल्लीत मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदानफलटण, दि. १६ ऑक्टोबर : शाश्वत इथेनॉल उत्पादन, पर्यावरण संवर्धन आणि आधुनिक औद्योगिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातील उल्लेखनीय योगदानाबद्दल फलटण येथील स्वराज ग्रीन पॉवर अँड फ्युएल लिमिटेडला प्रतिष्ठेचा ‘इंडिया ग्रीन एनर्जी अवॉर्ड २०२६’ प्रदान करण्यात आला. ‘पर्यावरण संरक्षण आणि कार्यक्षम औद्योगिक व्यवस्थापनासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा अवलंब करणारा सर्वोत्कृष्ट साखर इथेनॉल उत्पादक’ या श्रेणीत कंपनीने सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळविल्याचे कंपनीच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीत नमूद करण्यात आले आहे.नवी दिल्ली येथे १४ ऑक्टोबर रोजी आयोजित सोहळ्यात भारत सरकारचे केंद्रीय नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद येसो नाईक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कंपनीच्या वतीने संचालिका कु. ताराराजे रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि डिस्टिलरी विभागाचे महाव्यवस्थापक संजय पवार यांनी पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला ऊर्जा क्षेत्रातील विविध मान्यवर आणि तज्ज्ञ उपस्थित होते.पर्यावरणपूरक औद्योगिक विकासावर भरकंपनीचे प्रवर्तक तथा माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि ॲड. सौ. जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराजने हरित ऊर्जा आणि शाश्वत औद्योगिक विकासाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण वाटचाल केली आहे.कंपनीच्या एकात्मिक साखर, इथेनॉल आणि सहवीज निर्मिती प्रकल्पामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याबरोबरच सांडपाणी व्यवस्थापन, प्रदूषण नियंत्रण आणि संसाधनांच्या पुनर्वापराला प्राधान्य दिले जाते. औद्योगिक उत्पादनाची कार्यक्षमता वाढविताना पर्यावरणावरील प्रतिकूल परिणाम कमी करण्यासाठी कंपनी प्रयत्नशील आहे. कार्बन उत्सर्जन कमी करून अधिक शाश्वत उत्पादन पद्धती विकसित करण्यावरही भर दिला जात आहे.देशाच्या ऊर्जा सुरक्षेला योगदानकेंद्र सरकारच्या ‘इथेनॉल मिश्रित पेट्रोल’ (EBP) कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी इथेनॉल उद्योग महत्त्वाची भूमिका बजावत आहे. स्वराजचा इथेनॉल उत्पादनातील सहभाग देशाची ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यास आणि आयातीत इंधनावरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्दिष्टाला हातभार लावण्यास पूरक ठरत आहे.भविष्यात इथेनॉल उत्पादन क्षेत्राचा विस्तार करण्याबरोबरच कॉम्प्रेस्ड बायोगॅस (CBG) प्रकल्प आणि आधुनिक हरित तंत्रज्ञानाच्या विकासावर लक्ष केंद्रित करण्याची कंपनीची दिशा आहे. या माध्यमातून अक्षय ऊर्जेच्या क्षेत्रातील संधींचा लाभ घेण्यासोबतच औद्योगिक विकास अधिक पर्यावरणपूरक करण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेतकरी आणि ग्रामीण विकासासाठीही कटिबद्धऊर्जा उत्पादनातील योगदानासोबतच शेतकरी कल्याण, ग्रामीण भागातील आर्थिक विकास आणि स्थानिक समुदायाच्या सक्षमीकरणाला कंपनी महत्त्व देते. साखर उद्योगाशी संबंधित ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि शाश्वत औद्योगिक विकासाच्या माध्यमातून स्थानिक पातळीवर रोजगार व आर्थिक संधी वाढविणे, या बाबींनाही कंपनीच्या कार्यात महत्त्वाचे स्थान आहे.सलग दुसऱ्या वर्षी मिळालेल्या या पुरस्कारामुळे स्वराजच्या पर्यावरणपूरक औद्योगिक उपक्रमांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाल्याचे मानले जात आहे. या गौरवामुळे कंपनीच्या अधिकारी, कर्मचारी आणि स्वराज परिवारामध्ये समाधा --- ## जैन सोशल ग्रुप च्या वतीने नगरसेविका कुमारी सिद्धांली शहा व सुवर्णकन्या ऋतुजा पिसाळ यांचा सत्कार - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/jana-sashal-garapa-caya-vatana-nagarasavaka-kamara-sathathhal-shaha-va-savaranaekanaya-ritaja-pasali-yaca-satakara - **Published**: 2026-10-16 10:23 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: फलटणच्या लेकींचा सत्कार 🌸 जगातील सर्वात तरुण नगरसेविका कुमारी सिद्धालि अनुप शहा व सुवर्णकन्या ऋतुजा दादासाहेब पिसाळ यांचा जैन सोशल ग्रुप कडून सत्कार! फलटण- 21 व्या वर्षी नगरसेवक पदी निवडून येऊन जगातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झालेल्या फलटण नगरपरिषदेच्या नगरसेविका कु. सिद्धाली शहा तसेच आशियाई हॉकी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या फलटण येथील कु.ऋतुजा दादासाहेब पिसाळ याचां जैन सोशल ग्रुप फलटण मार्फत सन्मानचिन्ह, शाल ,श्रीफळ व मोत्याची माळ देऊन जैन सोशल ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष व लायन्स क्लबचे उपप्रांतपाल श्री. मंगेशशेठ दोशी (गुणवरेकर)व सौ.पूजाभाभी दोशी ( गुणवरेकर),MaRC योगा व मेडिटेशन कमिटी कन्व्हेनर सौ.सविताभाभी दोशी,MaRC महिला सबलीकरण कमिटी कन्वेनर सौ. स्मिताभाभी शहा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्री.श्रीपाल जैन,सचिव सौ.निना कोठारी,खजिनदार श्री. राजेश शहा, उपाध्यक्ष श्री.प्रीतम शहा,संगिनी फोरमच्या अध्यक्षा सौ.मनिषा व्होरा,JSGमाजी अध्यक्ष श्री.राजेंद्र कोठारी, श्री.सचिन शहा,सह सचिव श्री. हर्षद गांधी, संचालक डॉ.श्री. मिलिंद दोशी,सौ.मनिषा घडिया श्री.दादा पीसाळ ,सौ.पीसाळ बहुसंख्य जैन सोशल ग्रुप दंपती सदस्य व श्रावक-श्राविका उपस्थित होते. यावेळी बोलताना श्री.मंगेशशेठ दोशी यांनी कु.सिद्धाली शहा व कु. ऋतुजा पिसाळ यांचे अभिनंदन करून आपल्या मुळे फलटणचे नाव जगात प्रसिद्ध झाल्याचे सांगून आम्हा सर्वांना आपला सार्थ अभिमान आहे असे प्रतिपादन केले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट असे सूत्रसंचालन सौ. दीप्ती राजवैद्य यांनी केले. --- ## दुष्काळी परिस्थितीत फलटण तालुक्यात पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही, आ. सचिन पाटील - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/thashhakali-parasathatata-faltanae-talkayata-panaeyacaya-panaeyaca-kamatarata-bhasa-thanaera-naha-aa-sacana-patal - **Published**: 2026-10-16 10:12 - **Category**: प्रशासन - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: दुष्काळी परिस्थितीत पिण्याच्या पाण्याची उपायोजना दुष्काळी परिस्थितीत टंचाईग्रस्त गावांना पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू देणार नाही – आमदार सचिन पाटीलफलटण तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांचा आढावा; प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देशराज महाराष्ट्र टाइम्स.फलटण : अल निनोच्या प्रभावामुळे यंदा महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांत पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. महाराष्ट्र शासनाने फलटण तालुका दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात येत आहे. तालुक्यातील कोणत्याही गावाला पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहू दिले जाणार नाही, अशी ग्वाही आमदार सचिन पाटील यांनी दिली.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (MJP) उपविभाग, फलटण अंतर्गत तालुक्यातील १८ पाणी साठवण योजनांच्या कामांची तसेच उपलब्ध पाणीसाठ्याची प्रत्यक्ष पाहणी करून आढावा घेतला. दुष्काळी परिस्थितीत ज्या गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, अशा गावांना या साठवण तलावांमधून टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या नियोजनावर यावेळी विशेष भर देण्यात आला.या पाहणीदरम्यान विडणी, निंबलक, पिंप्रद, राजाळे, सोमंथळी, गिरवी, धुळदेव आणि वाठार निंबाळकर येथील पाणी साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरले असल्याचे निदर्शनास आले. मात्र, सोनगाव आणि सरडे येथील साठवण तलावांना अद्याप विद्युतपुरवठा जोडण्यात आलेला नसल्याने ते पूर्णपणे रिकामे असल्याचे आढळले. तसेच शिंदेवाडी येथील साठवण तलावाच्या कामात विद्युत रोहित्र स्थलांतरित करण्याचे काम प्रलंबित असल्याचेही समोर आले.या प्रलंबित कामांची दखल घेत आमदार सचिन पाटील यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून सोनगाव, सरडे आणि शिंदेवाडी येथील कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. ही कामे वेळेत पूर्ण झाल्यास नीरा उजवा कालव्याचे पिण्याच्या पाण्याचे आवर्तन उपलब्ध झाल्यानंतर संबंधित साठवण तलाव पूर्ण क्षमतेने भरण्यास मदत होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, होळ-खामगाव, निंभोरे, सस्तेवाडी आणि ठाकूरकी-फरांदवाडी येथील पाणी साठवण तलावांची कामे प्रगतिपथावर आहेत. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करून योजना कार्यान्वित करण्याच्या सूचना आमदार सचिन पाटील यांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.भविष्यात पाणीटंचाई निर्माण झाल्यास या साठवण तलावांमधून टँकरद्वारे संबंधित गावांना पाणीपुरवठा करणे सुलभ होणार आहे. त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करावे, प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत आणि तालुक्यातील कोणत्याही गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देश आमदार सचिन पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.या पाहणी दौऱ्यावेळी संबंधित लाभक्षेत्रांतील नागरिक, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार उपस्थित होते. --- ## शेतकऱ्यांची बँक शेतकऱ्यांना दर्जेदार सेवा, देणार का निवडणुकीपूर्तीच शेतकऱ्यांची आठवण काढणार, किशोर शिंदे. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/shatakariyaca-bka-shatakariyana-tharajathara-sava-thanaera-ka-navadanaekaparataca-shatakariyaca-aathavanae-kadhanaera-kashara-shatha - **Published**: 2026-10-14 10:16 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक पावणेदोनशे उमेदवार! लाखो शेतकरी! पण शेतकऱ्यांसाठी ठोस योजना आहेंत कुठे?राज महाराष्ट्र टाइम्स सहकाराच्या नावाने राजकारण करणाऱ्यांनी आता उत्तर द्यावे!सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही कोणाच्या बापजाद्यांची खासगी मालमत्ता नाही! ही बँक लाखो शेतकऱ्यांच्या घामातून उभ्या राहिलेल्या सहकार व्यवस्थेचा महत्त्वाचा आर्थिक आधार आहे. या बँकेच्या निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी पुढे येणाऱ्या पावणेदोनशे उमेदवारांना एक साधा, पण अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे—तुम्ही निवडून आल्यानंतर लाखो शेतकऱ्यांच्या आयुष्यात नेमका कोणता बदल घडवणार आहात?शेतकऱ्यांना वेळेवर पीककर्ज मिळणार का? कर्जावरील व्याजाचा बोजा कमी होणार का? थकीत कर्जदार शेतकऱ्यांना सन्मानाने पुन्हा उभे राहण्याची संधी मिळणार का? ऊस उत्पादक, दूध उत्पादक, फळबागायतदार, भाजीपाला उत्पादक आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र आर्थिक योजना आणणार का? नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकटात सापडणाऱ्या शेतकऱ्याला बँक कोणता आधार देणार?आणि सर्वांत महत्त्वाचा प्रश्न—देशातील बँकिंग क्षेत्रात राष्ट्रीयीकृत बँका, खासगी बँका, लघुवित्त संस्था आणि विविध वित्तीय सेवा पुरवठादार यांच्यात स्पर्धा वाढत असताना, या स्पर्धेचा प्रत्यक्ष फायदा सातारा जिल्हा बँकेच्या शेतकरी सभासदांना मिळणार आहे का?इतर बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी तुलनेने कमी व्याजदर, डिजिटल बँकिंग, जलद कर्जप्रक्रिया आणि आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न करत असतील, तर सातारा जिल्हा बँक आपल्या सभासदांना अधिक स्पर्धात्मक, परवडणाऱ्या आणि दर्जेदार सेवा देण्यासाठी काय करणार?शेतकऱ्यांना केवळ सहकारी बँकेचे सभासद म्हणून ओळख दिली जाणार, की त्यांना बँकेच्या स्पर्धात्मक धोरणांचा प्रत्यक्ष आर्थिक लाभही मिळणार?कर्ज स्वस्त मिळणार का? कर्जासाठी हेलपाटे कमी होणार का? अनावश्यक विलंब थांबणार का? डिजिटल सेवा गावपातळीवर पोहोचणार का? आणि सभासदांना मिळणाऱ्या सेवांचा दर्जा खासगी व राष्ट्रीयीकृत बँकांच्या तोडीचा करण्यासाठी कोणता कृती आराखडा आहे?या प्रश्नांची ठोस, आकडेवारीवर आधारित आणि कालमर्यादा असलेली उत्तरे उमेदवारांकडे नसतील, तर मग निवडणूक नेमकी कशासाठी?सहकाराच्या विकासासाठी की सत्तेच्या खुर्चीसाठी? शेतकऱ्यांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी की ठरावीक राजकीय आणि आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी?१. बँकिंग क्षेत्रातील स्पर्धेचा फायदा शेतकऱ्यांना मिळणार की नाही?आज शेतकऱ्यांसमोर उत्पादन खर्च, मजुरी, खते, बियाणे, औषधे, सिंचन, वीजबिल आणि कर्जावरील व्याज यांची मोठी आर्थिक आव्हाने आहेत. अशा परिस्थितीत बँकेकडून मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर, कर्ज मंजुरीसाठी लागणारा वेळ आणि बँकिंग सेवांचा दर्जा हे शेतकऱ्याच्या आर्थिक नियोजनासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरतात.मग सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत उभ्या असलेल्या उमेदवारांनी स्पष्ट केले पाहिजे—पात्र शेतकरी सभासदांना शक्य तितक्या स्पर्धात्मक व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी काय करणार?कर्जावरील व्याजाचा प्रत्यक्ष आर्थिक भार कमी करण्यासाठी कोणत्या कायदेशीर व आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य उपाययोजना राबवणार?केंद्र व राज्य शासनाच्या व्याजसवलत योजनांचा पात्र शेतकऱ्यांना पूर्ण लाभ मिळवून देण्यासाठी कोणती व्यवस्था उभारणार?पीककर्ज, मध्यम मुदतीचे कर्ज, ठिबक सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, पशुपालन आणि कृषीपूरक व्यवसायांसाठी कर्जप्रक्रिया अधिक सुलभ करणार का?कर्ज मंजुरी, वितरण आणि नकार याबाबत स्पष्ट निकष व कालमर्यादा जाहीर करणार का?राष्ट्रीयीकृत व खासगी --- ## दुष्काळी परिस्थिती पाहता पाण्याचा वापर काटकसरीने करावा जिल्हा परिषद सदस्य सौ. वैशालीताई कांबळे यांचे नागरिकांना आवाहन. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/thashhakali-parasathata-pahata-panaeyaca-vapara-katakasarana-karava-jalha-parashhatha-sathasaya-sa-vashaltaii-kabli-yaca-nagarakana-aavahana - **Published**: 2026-10-14 07:13 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: दुष्काळी परिस्थितीसाठी नियोजन दुष्काळी परिस्थिती पाहता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा!जिल्हा परिषद सदस्या सौ.वैशालीताई कांबळे यांचे आवाहन 💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥फलटण.फलटण: एल निनोच्या प्रभावामुळे चालू वर्षात सातारा जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीत घट झाली असून, पारंपरिक जलस्रोत आटत चालले आहेत. परिणामी ग्रामीण आणि नागरी भागांत पाणीटंचाईची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी शहरी व ग्रामीण भागांतील नागरिकांनी पाणी बचतीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. ग्रामीण भागात धरणे, कालवे, नद्या आणि तलावांमधून पिण्याच्या पाण्याव्यतिरिक्त अन्य कारणांसाठी होणारा अनधिकृत पाणी उपसा टाळावा.टँकरद्वारे पाणीपुरवठा होणाऱ्या गावांमध्ये पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी आणि घरगुती कामांसाठी करावा.शेतकऱ्यांनी पारंपरिक सिंचन पद्धतीऐवजी ठिबक व तुषार सिंचनाचा अवलंब करावा. उपलब्ध पाण्याचा विचार करून पिकांचे नियोजन करावे, असे आवाहनही केले आहे.“सध्याची परिस्थिती पाहता पाण्याचा थेंब अन् थेंब वाचवणे हे प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे. नेहमीप्रमाणे पाण्याचा अनावश्यक वापर टाळून गरजेपुरतेच पाणी वापर करणे गरजेचे आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पाण्याचा अपव्यय टाळावा.असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य सौ.वैशालीताई कांबळे यांनी केले आहे. --- ## फलटणचे ग्रामदैवत माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती, (पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मान) - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanaeca-garamathavata-malijaii-matharata-patarakara-bthhavacaya-hasata-mahaaarata-patarakaraca-shal-va-sharafali-thauuna-sanamana - **Published**: 2026-10-13 12:59 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: पत्रकारांचा सन्मान लायन्स क्लब च्या वतीने माळजाई मंदिरात पत्रकार बांधवांच्या हस्ते महाआरती; पत्रकारांचा शाल-श्रीफळ देऊन सन्मानपत्रकारिता हा लोकशाहीचा मजबूत आधारस्तंभ; समाजातील जनतेचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य कौतुकास्पद — माळजाई मंदिर व उद्यान समितीचा उल्लेखनीय उपक्रमराज महाराष्ट्र टाइम्स फलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त मंगळवार, दि. १३ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी ठीक १२ वाजता माळजाई देवी मंदिरात फलटण शहरातील ज्येष्ठ पत्रकार व पत्रकार बांधवांच्या शुभहस्ते महाआरती उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाली. यावेळी उपस्थित ज्येष्ठ पत्रकारांचा शाल व श्रीफळ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.पत्रकारितेच्या सामाजिक योगदानाचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या विशेष उपक्रमातून पत्रकार बांधवांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. समाजातील विविध प्रश्नांना वाचा फोडणे, सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी प्रशासनापर्यंत पोहोचविणे, शासनाच्या विविध योजना व निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविणे आणि सामाजिक, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच नागरी प्रश्नांवर निर्भीडपणे भूमिका मांडणे, तसेच धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या फलटण शहर आणि तालुक्यातील धार्मिक कार्यक्रमांची माहिती नागरिकांना प्रसार माध्यमाद्वारे माहीत करून देणेअशी महत्त्वपूर्ण सामाजिक बांधिलकी आणि जबाबदारी पत्रकारिता पार पाडत असते.लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारितेचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. समाजातील घडामोडींवर लक्ष ठेवून जनतेच्या प्रश्नांना व्यासपीठ मिळवून देण्याबरोबरच प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दुवा म्हणून पत्रकार कार्य करतात. अन्याय, समस्या आणि जनहिताच्या विषयांना प्रसिद्धी देऊन लोकशाही अधिक सक्षम करण्यामध्ये पत्रकारांचे योगदान मोलाचे आहे. त्यांच्या लेखणीमुळे अनेक प्रश्न समाजासमोर येतात, संबंधित यंत्रणांचे लक्ष वेधले जाते, आणि सकारात्मक बदलांना चालना मिळते. पत्रकारितेतील ही सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन माळजाई मंदिर व उद्यान समितीने पत्रकार बांधवांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम राबविला.या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार श्री. अरविंदभाई मेहता, श्री. युवराज पवार, श्री. विकास शिंदे, श्री. सुधीर अहीवळे, श्री. राजाभाऊ बोंद्रे, श्री. सागर चव्हाण, श्री. वैभव गंगतीरे, श्री. गणेश भोईटे आणि श्री. शेखर गायकवाड यांचा शाल व श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.माळजाई देवीच्या नवरात्रोत्सवाला धार्मिक श्रद्धेची जोड देतानाच सामाजिक सलोखा, परस्पर स्नेह आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या सन्मानाची परंपरा जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला. मंदिर व उद्यान समितीच्या या उपक्रमामुळे पत्रकारिता क्षेत्रातील बांधवांप्रती आदरभाव व्यक्त झाला असून, सामाजिक कार्य आणि पत्रकारिता यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ होण्यास मदत झाली.यावेळी माळजाई मंदिर व उद्यान समितीचे चेअरमन श्री. प्रमोद निंबाळकर, खजिनदार श्री. महेश गरवालीया तसेच लायन्स मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटलचे सचिव श्री. चंद्रकांत कदम उपस्थित होते.माळजाई मंदिर व उद्यान समितीच्या वतीने नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने धार्मिक कार्यक्रमांसोबत सामाजिक बांधिलकी जपणारे विविध उपक्रम राबविण्यात येत असून, पत्रकार बांधवांचा सन्मान हा त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग ठरला. समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करणे आणि सामाजिक ऐक्याची भावना वृद्धिंगत करणे, हा --- ## स्मार्ट ग्राम पंचायत जाधववाडी (फलटण )चा कचरा निर्मूलनाचा भोंगळ कारभार - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/samarata-garama-pacayata-jathhavavada-faltanae-ca-kacara-naramalnaca-bhagali-karabhara - **Published**: 2026-10-13 11:42 - **Category**: आरोग्य - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: कचरा निर्मूलन आणि स्वच्छता 💥राज महाराष्ट्र टाइम्स. 💥💥फलटण (जाधव वाडी)फलटण शहराला लागून असणाऱ्या स्मार्ट ग्रामपंचायत जाधव वाडी म्हणून ओळखणाऱ्या ग्रामपंचायतचा कचरा कुंड्यांचा कचरा निर्मूलनाचा प्रश्न आता दिवसेंदिवस गहण होत असून नागरिक दुर्गंधीमुळे त्रस्त झाल्याचे दिसून येत असून गिरवी नाका ते विंचुरणी रस्त्यावर इंग्लिश मीडियम स्कूलच्या समोर असणारी कचराकुंडी तून कचरा रस्त्यावर बाहेर येऊन पडला तरी उचलला जात नाही उलट तो जाळून त्याला आग लावण्यात येत आहे. रात्री लागलेल्या कचराकुंडीच्या आगीला फलटण नगर परिषदेच्या अग्निशामक दलाने जाऊन त्वरित विझवले व वाहतुकीस धुराचा होत असणारा अडथळा दूर केला. तरी सुद्धा अजूनही 13 ऑक्टोबर दिवसभर कचराकुंडीतून धूर निघतच आहे. तर ग्रामपंचायतच्या हाकेच्या अंतरावर असणाऱ्या कचराकुंडीचा रस्ता फलटण गिरवी रस्त्यावर दुरावस्थेत पडलेला असताना सुद्धा ग्रामपंचायत अधिकारी कर्मचारी आणि त्या रस्त्याने करणारे पंचायत समितीचे लोकप्रतिनिधी तसेच पंचायत समितीचे अधिकारी यांच्या निदर्शनास येत असून सुद्धा डोळे झाक करत आहेत .यामुळे जाधववाडी येथील नागरिक संतप्त भावना व्यक्त करत आहेत. याबाबत त्वरित स्वच्छता करण्यात यावी अशी नागरिकांनी मागणी केली आहे. पंचायत समिती फलटण आणि सातारा जिल्हा परिषद प्रशासन यांनी गांभीर्याने दखल घेऊन या गावच्या स्वच्छतेवर लक्ष द्यावे अशी आग्रही मागणी नागरिक पुन्हा पुन्हा करत आहेत. --- ## माळजाई देवी मंदिर येथे नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार 12 ऑक्टोबर 2026 , आमदार सचिन पाटील आणि नगराध्यक्ष समशेर सिंह निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महाआरती. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/malijaii-thava-mathara-yatha-navaratara-utasavanamatata-samavara-12-oikatabra-2026-aamathara-sacana-patal-aanae-nagarathhayakashha-samashara-saha-nablikara-yacaya-paramakha-upasathatata-mahaaarata - **Published**: 2026-10-12 05:17 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: फलटण येथे महागाई देवीची महाआरती माळजाई देवी मंदिरात महाआरतीचे आयोजन... फलटण कोरेगाव मतदार संघाचे आमदार सचिन पाटील व लोकनियुक्त नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांची महाआरतीस उपस्थितीफलटण : लायन्स क्लब फलटण संचलित माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या नवरात्र व दसरा महोत्सवानिमित्त सोमवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२६ रोजी श्री माळजाई देवी मंदिरात अभिषेक, आरती व महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे.तसेच, सायंकाळी ठीक ७ वाजता श्री माळजाई देवीची महाआरती आयोजित करण्यात आली आहे. या महाआरतीस फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री.सचिन पाटील व सौ.गौरीवहिनी सचिन पाटील तसेच फलटण नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर व सौ.मनीषावहिनी समशेरसिंह नाईक निंबाळकर हे उपस्थित राहणार आहेत. यावेळी लायन्स क्लब परिवारातील सर्व सन्माननीय सदस्यांचीही उपस्थिती राहावे ही विनंती.नवरात्रोत्सवाच्या या मंगलमय पर्वात श्री माळजाई देवीच्या दर्शनाचा, अभिषेकाचा व महाआरतीचा लाभ फलटण शहरासह परिसरातील सर्व भाविकांना घेता यावा, यासाठी सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन लायन्स क्लब फलटण आणि माळजाई मंदिर व उद्यान समिती, फलटण यांच्या वतीने करण्यात आले आहे.- दिनांक: सोमवार, १२ ऑक्टोबर २०२६- सकाळी ७.३० वाजता: श्री माळजाई देवीचा अभिषेक व आरती- सायंकाळी ७.०० वाजता: श्री माळजाई देवीची महाआरती- स्थळ: श्री माळजाई देवी मंदिर, फलटण --- ## स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांसाठी आक्रमक. सरसकट पंचनामे करा दुष्काळ जाहीर होऊन पण दिलासा नाही. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/savabhamana-shatakara-saghatana-shatakariyasatha-aakaramaka-sarasakata-pacanama-kara-thashhakali-jahara-hauuna-panae-thalsa-naha - **Published**: 2026-10-10 14:27 - **Category**: कृषी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: शेतकरी संघटनेची दुष्काळाबाबत मागणी. राज महाराष्ट्र टाइम्स.*स्वाभिमानी शेतकरी संघटना, फलटण तालुका**दिनांक: ९/१०/२०२६**फलटण तालुक्यात दुष्काळ जाहीर पण प्रत्यक्षात दिलासा नाही; सरसकट पंचनामे करून भरघोस मदत द्या - स्वाभिमानीची आक्रमक मागणी*फलटण : फलटण तालुक्यामध्ये शासनाने दुष्काळ जाहीर केला असला तरी प्रत्यक्षात शेतकऱ्यांना अजून कोणताही दिलासा मिळालेला नाही. तालुक्यातील अनेक गावांमध्ये पेरणी झाल्यानंतर पावसाने दीर्घ दडी मारल्याने पिके पूर्णपणे जळून गेलेली आहेत. सोयाबीन, कापूस, बाजरी, मका, कांदा, ऊस या पिकांचे ७०% पेक्षा जास्त नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे फलटण तालुक्यात काही भागात पिके वरून हिरवी दिसत असली तरी जमिनीत ओलावा संपल्यामुळे आणि पाण्याअभावी त्या पिकामध्ये दाणे भरण्याची, उत्पन्न देण्याची क्षमता अजिबात राहिलेली नाही. फलटण तालुक्यात सरासरी ७०% पिकांचे नुकसान झाले असून काही ठिकाणी १००% नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ दोन-चार गावामध्ये पंचनामा करून अहवाल पाठविणे हा शेतकऱ्यांवर अन्याय ठरेल, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतली आहे.या संदर्भात आज दि. ९ ऑक्टोबर २०२६ रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने फलटणचे तहसीलदार अभिजित जाधव यांना निवेदन दिले. या निवेदनामध्ये खालील प्रमुख ८ मागण्या करण्यात आल्या आहेत.*प्रमुख मागण्या -**१)* प्रत्येक गावात आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधारवर जाऊन सरसकट पंचनामे करण्यात यावे.*२)* पंचनाम्यामध्ये फक्त जळालेली पिकेच नाहीतर हिरवी दिसणाऱ्या पिकांचाही पंचनामा करण्यात यावा. कारण हिरवी दिसणारी पिके पाण्याअभावी ७०% नुकसानग्रस्त झालेली आहेत.*३)* दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी भरघोस मदत जाहीर करावी.*४)* शेतसारा / कृषी पंपाचे लाईट बिल आणि मुलांची शैक्षणिक फी पूर्ण माफ करावी.*५)* राज्यातील आमदार, खासदार, मंत्री यांचे दरमहिन्याचे पगार बंद करून तो निधी राज्यातील शेतकऱ्यांच्या योजनांसाठी द्यावा.*६)* माजी आमदार, खासदार यांचे दरमहा पेन्शन बंद करून तो फंड दुष्काळग्रस्त योजनांसाठी देण्यात यावा.*७)* जनावरांसाठी पाणी व चाऱ्याची सोय करावी, तसेच सिंचन व जलसंधारणाचे दीर्घकालीन नियोजन करावे.*८)* मोबाईल ॲपद्वारे शेतकऱ्यांची पिकपाणी केली असता ती सातबारावरती दिसत नाही, ती पिकपाणी त्वरीत ४८ तासात सातबारावर दाखवावी.वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शेतकऱ्यांना तात्काळ पिकांचे सरसकट पंचनामे करून दुष्काळात भरघोस मदत देऊन न्याय द्यावा, अन्यथा शेतकरी स्वाभिमानी संघटना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकरनितीन यादव फलटण तालुका अध्यक्ष प्रमोद गाडे युवक राज्य प्रवक्ते डॉक्टर रवींद्र घाडगे जिल्हा सरचिटणीस विक्रम पवार शहराध्यक्ष किसन शिंदे बाबा कोकरे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते --- ## श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांचा 61 वा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय, मा.आ.दीपक रावजी चव्हाण. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/sharamata-sajavaraja-naiika-nablikara-yaca-61-va-vadhathavasa-sajara-na-karanaeyaca-naranaeya-maaathapaka-ravaja-cavahanae - **Published**: 2026-10-09 05:31 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: श्रीमंत संजीव राजे यांचा वाढदिवस 💥 राज महाराष्ट्र टाइम्स💥💥फलटण, श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर माजी सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, यावर्षीचा 9 ऑक्टोबर 2026 रोजी आपला वाढदिवस शेतकऱ्यांच्या वरील दुष्काळाच्या संकटामुळे साजरा करणार नाहीत अशी माहिती फलटण कोरेगाव मतदारसंघाचे माजी आमदार श्री दीपक राव चव्हाण यांनी दिली आहे.महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय श्री. अजित दादा पवार यांच्या आकस्मिक अपघाती निधनामुळे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात यावर्षी पावसाने ओढ दिल्याने दुष्काळी परिस्थिती ओढवली आहे. तसेच विधान परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता पाहता श्रीमंत संजीव राजे यांनी आपला वाढदिवस साजरा न करण्याचे आवाहन सर्व कार्यकर्त्यांना, मित्रपरिवार ना आणि चाहत्यांना दिला आहे. 💥 वाढदिवसानिमित्त श्रीमंत संजीव राजे यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वाचे काही पैलू💥🟣🟣🟣🟣🟣🟣श्रीमंत संजीव राजे यांचा 61 वा वाढदिवस या निमित्ताने या उदार आणि जनतेशी नाळ असणाऱ्या व्यक्तीमत्त्वाबद्दल बोलण्यासाठी शब्द मात्र अपुरे पडतील. शब्दांची शृंखला अपुरे पडेल असे हे व्यक्तिमत्व, राज घराण्याचा वारसा असून सुद्धा श्रीमंत मालोजीराजे यांचे सर्वसामान्य जनतेबाबत असणारे विचार आपल्या राजकीय आणि सामाजिक कार्यातून त्यांनी आपल्या पिढीतून दाखवून दिले आहेत, फलटण तालुक्याच्या तसेच सातारा जिल्ह्याच्या विशेष उल्लेखनीय अत्यावश्यक विकासासाठी सत्तेत असताना आणि सत्ता नसतानाही सदैव कार्यरत असणार हे व्यक्तिमत्व, सर्वसामान्य कुटुंबांशी नाळ असणारे सर्वसामान्यांच्या समस्यांचे जाणीव असणारे तसेच व्यवसायाभिमुख असताना सुद्धा व्यवसायातील असणाऱ्या सहकाऱ्यांना एक कुटुंब वत्सल म्हणून नेहमीच मार्गदर्शन करणारे आणि प्रत्येक कार्यकर्ता, व्यवसायातील निगडित असणारे इतर सर्व, हे एक आपल्या कुटुंबाचा सदस्य म्हणून नेहमीच अतिशय मित भाषी, उदारमतवादी, आणि संस्काराचे जाण असणाऱ्या या व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने सुद्धा साजरा न करता शेतकऱ्यांच्या दुष्काळी परिस्थितीचे भान ठेवून तसेच स्वर्गीय अजितदादा यांच्या आकस्मिक अपघाती मृत्यूच्या निधनाच्या दुःखद घटनेची जाणीव, आणि आचारसंहिता, याबाबत जाणीवेत राहून यावर्षीचा वाढदिवस त्यांनी साजरा न करण्याचं जाहीर केले आहे, अशी माहिती माजी आमदार श्री दीपक रावजी चव्हाण यांनी दिली आहे. अशा या थोर उदार विकासाभिमुख आणि जनतेच्या समस्यांची प्रश्नांची जाण असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाला प्रभू रामचंद्राच्या कृपेने उदंड दीर्घायु निरोगी आयुष्य लाभो, आणि हे समाजसेवेचे व्रत राजकारणाच्या पलीकडे जपण्याचा आदर्श दिवसेंदिवस वृद्धिंगत होवो हीच प्रभू श्रीरामचंद्राच्या चरणी प्रार्थना. 💥सातारा न्यूज टीमच्या वतीने आणि राज महाराष्ट्र टाईम च्या नेटवर्क च्या वतीने बाबा आपणास उदंड आयुष्याच्या उदंड शुभेच्छा,💥💥💥 --- ## अंगातले भूत काढतो असे सांगून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा भोंदू संशयित सौरभ मदने याच्या फलटण शहर पोलिसांनी आवळल्या मुस्क्या - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/agatal-bhata-kadhata-asa-sagana-alpavayana-malvara-atayacara-karanaera-bhatha-sashayata-sarabha-mathana-yacaya-faltanae-shahara-palsana-aavalilya-masakaya - **Published**: 2026-10-08 13:25 - **Category**: गुन्हेगारी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: अल्पवयीन मुलीवर अत्याचार 💥राज महाराष्ट्र टाइम्स💥💥फलटण, फलटण शहरात भोंदूगिरी करून शेजारीच राहणाऱ्या कुटुंबातील व्यक्तींना अंगात भूत आहे ते भूत बाहेर काढतो असे सांगून व वेगवेगळे बनाव करून अल्पवयीन मुलीला विश्वासात घेऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करणारा संशयित आरोपी सौरभ मदने यास अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल होताच घटनेचे गांभीर्य ओळखून अवघ्या 24 तासात फलटण पोलिसांनी सात आक्टोबर 2026 रोजी आरोपीस अटक केली आहे. मेहरबान कोर्ट समोर आरोपीस उभे केले असता दिनांक 12 ऑक्टोबर 2026 पर्यंत कोर्टाने पोलीस कस्टडी सुनावली आहे. या संशयीत आरोपीच्या वारंवार त्रासाला आणि अत्याचाराला कंटाळून या शाळकरी मुलीने दिनांक 6 ऑक्टोबर 2026 रोजी घरातून पहाटे सकाळीच कोणालाही न सांगता बदनामी होईल या भीतीपोटी मानसिक तणावाखाली घरातून निघून वाई येथे गेली होती. वाई येथील पोलीस स्टेशनमध्ये सदर अल्पवयीन मुलगी आढळून आल्यानंतर या अल्पवयीन मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली. वरील घटना समजल्यानंतर फलटण शहरात एकच खळबळ उडाली आणि फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संतप्त कुटुंबीय आणि जमावा च्या वतीने कठोर कारवाई करण्याच्या उद्देशाने फलटण शहर पोलीस स्टेशन येथे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे तसेच फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री धन्यकुमार गोडसे यांच्या सूचनेनुसार आणि मार्गदर्शनानुसार फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांनी फलटण शहर चे पोलीस स्टेशनचे चाणाक्ष आणि कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सचिन शिंदे यांच्यासोबत फलटण शहर पोलीस स्टेशन येथील हुशार आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी पोलीस कॉन्स्टेबल विक्रम कुंभार, महेश जगदाळे, जितेंद्र टिके, संभाजी जगताप, यांनी मिळालेल्या माहितीनुसार अतिशय सुसूत्र पद्धतीने संशयित आरोपी सौरभ मदने यास विमानतळाच्या परिसरात मोठ्या शितापीने आणि धाडसाने अटक करून ताब्यात घेतले. फलटण शहर पोलीस स्टेशनच्या या अत्यंत तातडीच्या कारवाईने फलटण शहरातील नागरिकांनी आणि पीडितअल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. अशा प्रकारच्या घटना आता सातत्याने फलटण तालुक्यात दिसून येत असून लोकांच्या असाहाय्यतेचा फायदा घेऊन खोटे बनाव करून अंधश्रद्धेला खतपाणी घालून आपली पोळी भाजून घेणाऱ्या अशा भोंदूगिरी करणाऱ्या भोंदूंना कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी फलटण शहरातील विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे.🏵️अंधश्रद्धे विरोधात प्रबोधनाची गरज.🏵️हल्लीच्या काळात दिवसेंदिवस वाढत असणारा वेगवेगळ्या कारणामुळे मानसिक तणाव आणि या तणावापोटी अशा भोंदूगिरी करून लोकांच्या असाही त्याचा फायदा घेऊन लोकांना वेगवेगळ्या प्रसंगांना नाहक बळी पडावे लागत आहे याबाबत आता अंधश्रद्धेच्या विरोधात प्रबोधनाची गरज दिसून येत आहे. --- ## दुष्काळ निधी आणि पीक नुकसान भरपाई बाबत सर्वात मोठा निर्णय. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/thashhakali-nathha-aanae-paka-nakasana-bharapaii-bbta-saravata-matha-naranaeya - **Published**: 2026-10-04 09:04 - **Category**: कृषी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: दुष्काळ मदत 💥दुष्काळ निधी आणि पीक नुकसान भरपाईबाबत सर्वात मोठा निर्णय. 💥💥,🏵️राज महाराष्ट्र टाइम्स.🏵️राज्यातील दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांसाठी शासनाच्या आर्थिक मदतीबाबत अत्यंत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. दुष्काळ जाहीर होणे आणि शासनाची वाढीव मदत मिळण्याबाबत शासनाकडून पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण देण्यात आले आहे महत्त्वाचे मुद्दे: दुष्काळ घोषणा कधी?राज्यात दुष्काळाची अधिकृत घोषणा १५ ऑक्टोबरनंतरच केली जाणार आहे. एनडीआरएफच्या (NDRF) निकषानुसार पंचनाम्यांची प्रक्रिया ५ ऑक्टोबरनंतर पूर्ण होऊन अहवाल सादर होणार आहे. {नुकसान भरपाईत दुहेरी फायदा:}केंद्राच्या एनडीआरएफ निकषानुसार प्रति हेक्टर मिळणाऱ्या सुमारे ₹८,५०० मदतीसोबतच राज्य शासनाकडून अतिरिक्त नुकसान भरपाई देण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्याची दाट शक्यता आहे.{पंचनाम्यांची प्रक्रिया:}त्रिसदस्यीय समितीमार्फत बाधित महसूल मंडळांची माहिती व पंचनामे ५ ऑक्टोबरपर्यंत तयार होतील. त्यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांमार्फत राज्य शासनाकडे अहवाल पाठवला जाईल. (अजून किती वाट पाहावी लागेल?)मदतीचा अंतिम निर्णय १५ ऑक्टोबरनंतरच होणार असल्याने शेतकऱ्यांना आणखी किमान महिनाभर प्रतीक्षा करावी लागणार आहे. {शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना:}जोपर्यंत कृषी सहाय्यक किंवा तलाठ्यांमार्फत पिकाचा अधिकृत पंचनामा होत नाही, तोपर्यंत नुकसानग्रस्त पीक कोणत्याही परिस्थितीत मोडू नका किंवा नष्ट करू नका, अन्यथा मिळणाऱ्या शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागू शकते! --- ## शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटणच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा श्री राजेश हेंद्रे यांची बिनविरोध निवड. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/shapa-samaja-vathathal-mathara-tarasata-faltanaecaya-athhayakashhapatha-salga-cathayatha-shara-rajasha-hathara-yaca-bnavarathha-navada - **Published**: 2026-10-02 17:54 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: धार्मिक ट्रस्ट शिंपी समाज विठ्ठल मंदिर ट्रस्ट फलटण, अध्यक्ष पदाचा श्री राजेश हेंद्रे यांचा चौकार.🏵️राज महाराष्ट्र टाइम्स🏵️फलटण. फलटण शहरात रविवार पेठ येथे असणाऱ्या शिंपी समाज याच्या विठ्ठल मंदिर ट्रस्टच्या कार्यकारिणीची निवड होऊन सलग चौथ्यांदा अध्यक्षपदी श्री. राजेश हेंद्रे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली.तर उपाध्यक्षपदी श्री मिलिंद गाटे, व सचिवपदी श्री. राजेंद्र कुमठेकर यांची निवड झाली. फलटण येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या 93 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या सर्व निवडी झाल्या. विशेष म्हणजे समाजात असणारा एकोपा सर्व निवडी बिनविरोध करून प्रामुख्याने दिसून आला. तर सदस्य पदी डॉक्टर राजेंद्र हेंद्रे, राजेंद्र गाटे, देवेंद्र हेंद्रे ,विशाल काकडे, कौस्तुभ टाळकुटे ,मंगेश पोरे, सोहम गानबोटे, यांची निवड झाली. ट्रस्टच्या सल्लागार समितीत संजय जामदार, अविनाश कुमठेकर, श्रीपाद टाळकुटे, संजय हेंद्रे ,प्रकाश गाटे, महेश उरणे, बाळासाहेब पतंगे, चंद्र सेन कुमठेकर, रेखा हेंद्रे ,अंजली कुमठेकर, अश्विनी हेंद्रे, यांची निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांचे शिंपी समाजातील बंधू-भगिनींच्या वतीने अभिनंदन करून ट्रस्टच्या धार्मिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. याप्रसंगी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज विठ्ठल मंदिर महिला मंडळाच्या अध्यक्षा सुलभा मोहटकर, श्री संत नामदेव समाज उन्नती परिषदेचे अध्यक्ष करण भांबुरे यांची उपस्थिती होती. दरवर्षी ट्रस्टच्या वतीने विविध धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमाचे विठ्ठल मंदिर येथे आयोजन करण्यात येत असते तसेच श्री. संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊलींचा परतीचा पालखी सोहळा आळंदीच्या दिशेकडे प्रस्थान होताना एक दिवस विठ्ठल मंदिर येथे मुक्कामी असतो यावेळी ट्रस्टच्या वतीने माऊलीच्या मुक्कामी सोहळ्याचे अत्यावश्यक असे योग्य व शिस्तबद्ध नियोजन केले जाते. --- ## कै. लायन जगजीवन हिरजी गरवालिया, मिस्त्री यांच्या कार्याच्या स्मृती प्रित्यर्थ शोकसभा. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/ka-lyana-jagajavana-haraja-garavalya-masatara-yacaya-karayacaya-samata-paratayaratha-shakasabha - **Published**: 2026-10-01 18:46 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: शुभ सकाळ 💥 राज महाराष्ट्र टाइम्स,💥फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने कै.लायन जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाच्या स्मृती जतन करत, त्यांनी घालून दिलेल्या आदर्शांनुसार पुढील पिढीला प्रेरणा मिळावी, यासाठी शोकसभा घेण्यामागील प्रमुख उद्देश लायन्स क्लब ऑफ फलटणचा आहे.कै. लायन जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांनी फलटण शहराच्या सामाजिक व धार्मिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले. लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य व आंबाई -माळजाई देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष कै. लायन जगजीवन हिरजी गरवालीया मिस्त्री यांनी माळजाई देवी परिसराच्या विकासामध्ये त्यांचे अनमोल योगदान आणि समाजासाठी निस्वार्थ कार्य करण्याची त्यांची भावना ही अनेकांसाठी प्रेरणादायी राहिलेली आहे. त्यांच्या कार्याचा वारसा भविष्यात पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.श्री माळजाई देवी मंदिर व परिसर विकसित करण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान व अथक परिश्रम, जिद्द, संघर्ष व चिकाटी यामुळे लायन्स क्लब ऑफ फलटणच्या पुढील पिढीला आणि तमाम फलटणकर यांना एक आदर्श आणि प्रेरणा मिळणार आहे. सामाजिक हितासाठी लावलेले वृक्ष भविष्यात अनेकांना सावली देते, त्याचप्रमाणे समाजासाठी केलेले कार्य अनेक पिढ्यांना दिशा देत असते, ही दूरदृष्टी ठेवून त्यांनी आपले निस्वार्थ कार्य केले. कै. गरवालिया मिस्त्री यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजहिताचे विविध समाज उपयोगी उपक्रम सातत्याने राबविण्याचा लायन्स क्लब ऑफ फलटणचा प्रयत्न आहे.— लायन्स क्लब ऑफ फलटण. अध्यक्ष -श्री.रणजीत बर्गे, सचिव- श्री.प्रमोद निंबाळकर, खजिनदार- श्री.दिलीप शिंदे. --- ## गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची अल्पावधीत आर्थिक भरारी.. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/galkasa-palsa-ka-oiparatavaha-karadata-sasayataca-alpavathhata-aarathaka-bharara - **Published**: 2026-09-30 13:29 - **Category**: अर्थव्यवस्था - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सहकारी पतसंस्था गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी फलटणची अल्पावधीत आर्थिक प्रगती. राज महाराष्ट्र टाइम्स.फलटण. सहकार क्षेत्रात सक्षम नेतृत्व क्रियाशील संचालक मंडळ आणि कष्टाळू व मेहनती अधिकारी कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने फलटण येथील गॅलेक्सी प्लस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड ची आर्थिक प्रगती चा वाढता आलेख यशस्वीरित्या चालू असून या संस्थेने सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा जाहीर केले आहे. या संस्थेला सातत्याने ऑडिटचा अ वर्ग मिळाल्याची माहिती संस्थेचे क्रियाशील संस्थापक चेअरमन सचिन यादव यांनी दिली आहे. 💥 गॅलेक्सी प्लस सोसायटीच्या एकूण नऊ शाखा आणि 70 कोटी रुपयांच्या ठेवी💥.गॅलेक्सी प्लस च्या सर्वांच्या समन्वयाने आणि सहकार्याने तसेच नागरिकांच्या विश्वासास अल्पावधीतच पात्र झालेल्या या संस्थेचा व्यवसाय 125 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. नऊ शाखांच्या माध्यमातून 70 कोटी रुपयांच्या ठेवी आणि सभासदांचा आर्थिक गरजेपोटी एकूण 55 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे. संस्थेने सभासदांच्या हिताचा विचार करता सभासदांना तात्काळ सुलभ सेवा देण्यासाठी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या माध्यमातून विनम्र सेवा हे या संस्थेचे मुख्य वैशिष्ट्य आहे मोबाईल बँकिंग गोल्ड टेस्टिंग मशीन डिजिटल पिग्मी यासारख्या आधुनिक सुविधा उपलब्ध करून त्याचा थेट लाभ ग्राहकांना देण्याचा प्रयत्न या संस्थेच्या माध्यमातून मार्गदर्शक संस्थापक सचिन यादव हे आपल्या व्यावसायिक कौशल्याने करत असताना दिसून येत आहेत. गॅलेक्सी प्लस या संस्थेचा आता पुणे जिल्ह्यात सुद्धा वाढता विस्तार सुरू असून आंबेगाव पुणे येथेही नवीन शाखा कार्यरत झाली असून भविष्यात संस्थेचे कार्यक्षेत्र अल्पावधीतच उत्तुंग भरारी घेईल अशी आशा आणि संचालक मंडळाचे प्रयत्न चालू आहेत. सभासदांच्या विश्वासाने संस्थेच्या ठेवी दिवसेंदिवस वाढत असून संस्थेत सभासद ग्राहक यांच्याकडून मिळत असलेल्या उत्तम प्रतिसादाने आणि व्यवस्थापनाच्या कौशल्याने गॅलेक्सी प्लस क्रेडिट सोसायटी महाराष्ट्र आणि कर्नाटक लवकरच ग्राहकांच्या विश्वासास आणखी पात्र ठरणार आहे अशी माहिती संचालक मंडळाच्या वतीने देण्यात आली --- ## फलटण नगर परिषदेला प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 184. घरकुल - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-nagara-parashhathal-parathhanamatara-aavasa-yajana-shahara-ataragata-184-gharakal - **Published**: 2026-09-29 12:16 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: फलटण नगर परिषदेची घरकुल योजना. प्रधानमंत्री आवास योजना - शहरी अंतर्गत फलटण नगर परिषदेला 184 घरकुलांना मंजुरी व 1 कोटी 38 लक्ष रुपये घरकुल अनुदान मंजूरकेंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी *"प्रधानमंत्री आवास योजना - शहरी PMAY-U"* अंतर्गत सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीसाठी फलटण नगरपरिषद क्षेत्रातील पात्र लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.फलटण नगर परिषदेने सादर केलेल्या प्रस्तावास शासनाची मान्यता मिळाली असून, योजनेअंतर्गत *एकूण 184 घरकुलांना मंजुरी* देण्यात आली आहे. घरकुलांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या वाट्याचे मिळून *एकूण 1 कोटी 38 लक्ष रुपये इतके अनुदान* देखील मंजूर झाले आहे.या योजनेमुळे फलटण शहरातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना स्वतःचे पक्के घर मिळण्याचे स्वप्न साकार होणार आहे.या मंजुरीबद्दल फलटण नगर परिषदेचे मा.नगराध्यक्ष, मुख्याधिकारी व सर्व नगरसेवक यांनी शासनाचे आभार मानले असून, नगराध्यक्ष समशेर दादा यांनी नागरिकांना लवकरात लवकर घरकुलांचे बांधकाम सुरू करून घरकुल अनुदानाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे . --- ## कै. जगजीवन हिरजी गरवालिया (मिस्त्री) संस्थापक सदस्य लायन्स क्लब ऑफ फलटण यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ शोकसभा - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/ka-jagajavana-haraja-garavalya-masatara-sasathapaka-sathasaya-lyanasa-kalb-oifa-faltanae-yacaya-samataparatayaratha-shakasabha - **Published**: 2026-09-29 10:16 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: शोकसभा लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य कै. जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ३ ऑक्टोबर रोजी शोकसभेचे आयोजन केले आहे.फलटण : लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि फलटणमधील सामाजिक,धार्मिक व शैक्षणिक क्षेत्रात मोलाचे योगदान देणारे कै.जगजीवन हिरजी गरवालीया उर्फ मिस्त्री यांच्या दुःखद निधनानंतर त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी व त्यांनी केलेल्या बहुमूल्य कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने शनिवार, दिनांक ३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४ वाजता माळजाई मंदिर सभा मंडप, फलटण येथे शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.कै.जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांनी आपल्या प्रदीर्घ सामाजिक जीवनात फलटण शहराच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राच्या उन्नतीसाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. लायन्स क्लब ऑफ फलटणचे संस्थापक सदस्य म्हणून त्यांनी सामाजिक सेवेचा भक्कम पाया घातला. लायन्स क्लबच्या माध्यमातून समाजसेवेचे विविध उपक्रम राबविताना त्यांनी लायन्स मुधोजी आय चॅरिटेबल हॉस्पिटलच्या उभारणीत मोठा वाटा होता व डोळ्याच्या विकारावर होणारा उपचार सामान्य लोकांना मोफत व सुलभ होईल याची दूरदृष्टी त्यांनी पाहिली तसेंच फलटण मधील अनेक संस्थांच्या उभारणीत,जडणघडणीत आणि विकासात मोलाची भूमिका बजावली.अंबाई-माळजाई मंदिर देवस्थान ट्रस्ट, मुधोजी लायन्स चॅरिटेबल आय हॉस्पिटल, उघडा मारुती मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि फलटण एज्युकेशन सोसायटी यांसह फलटणमधील विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. या संस्थांच्या माध्यमातून त्यांनी केलेले कार्य, समाजाप्रती असलेली बांधिलकी आणि संस्थांच्या प्रगतीसाठी दिलेले योगदान सदैव स्मरणात राहील.समाजातील सर्व घटकांशी जिव्हाळ्याचे संबंध जपत सामाजिक कार्यासाठी त्यांनी दिलेले योगदान अत्यंत मोलाचे होते. त्यांच्या कार्यातून अनेकांना प्रेरणा मिळाली. त्यांच्या निधनाने फलटणच्या सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक क्षेत्राची मोठी हानी झाली असून, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले कार्य फलटणकरांच्या मनात कायम जिवंत राहील.कै. मिस्त्री यांच्या कार्याला अभिवादन आणि त्यांच्या स्मृतींना आदरांजली अर्पण करण्यासाठी आयोजित या शोकसभेस फलटणमधील सर्व क्षेत्रांतील मान्यवर, पत्रकार बांधव, विविध सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच त्यांच्यावर प्रेम करणारे तमाम फलटणकर उपस्थित राहणार आहेत.या शोकसभेचे नियोजन आणि आयोजन यशस्वी करण्यासाठी लायन्स क्लब ऑफ फलटण परिवारातील सर्व सदस्य तसेच क्लबच्या सहयोगी संस्थांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या सर्व पदाधिकारी व सदस्यांनी आपापली जबाबदारी स्वीकारून सहकार्य करावे. सर्वांनी आपल्या व्यस्त दिनक्रमातून वेळ काढून या शोकसभेला उपस्थित राहावे आणि कै. जगजीवन हिरजी गरवालीया (मिस्त्री) यांच्या स्मृतींना भावपूर्ण आदरांजली अर्पण करावी, असे आवाहन लायन्स क्लब ऑफ फलटणच्या वतीने करण्यात येत आहे.शोकसभेचा तपशील- दिनांक : शनिवार, ३ ऑक्टोबर २०२६- वेळ : सायंकाळी ठीक ४ वाजता- स्थळ : माळजाई मंदिर सभा मंडप, फलटण- आयोजक : लायन्स क्लब ऑफ फलटण. --- ## महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर, मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा शेतकऱ्यां साठी दिलासादायक निर्णय. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/maharashhatarata-thashhakali-jahara-makhayamatara-thavathara-fadavanaesa-yaca-shatakariya-satha-thalsathayaka-naranaeya - **Published**: 2026-09-26 06:42 - **Category**: कृषी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: शेती *राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय...*महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि दिलासा देणारी बातमी आहे. राज्यात पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री *देवेंद्र फडणवीस* यांनी आज *२६ सप्टेंबर २०२६* रोजी राज्यातील ३५८ पैकी *२६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर* केला आहे. म्हणजेच जवळपास *७५% महाराष्ट्र* दुष्काळाच्या कक्षेत आला आहे. निर्णय कसा झाला?- मुख्यमंत्री फडणवीस यांनी गेल्या दोन दिवसात स्वतः विदर्भ आणि मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, वाशीम जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी केली.- शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद साधला आणि पिकांची पाहणी केली.- दुष्काळ व्यवस्थापन संहितेतील *'ट्रिगर-१'* च्या निकषांनुसार ज्या तालुक्यांमध्ये निकष पूर्ण झाले आहेत, तिथे पहिल्या टप्प्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे.- काही तालुके पहिल्या यादीतून वगळले गेले असतील तर पुढील ट्रिगरमध्ये त्यांचा समावेश होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांना कोणते लाभ मिळणार? दुष्काळ जाहीर झाल्याने शेतकऱ्यांना शासकीय मदतीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारने तातडीने खालील उपाययोजना जाहीर केल्या आहेत: *१. महसूल आणि कर्ज सवलती:*- जमीन महसुलात पूर्ण सूट- पीक कर्जाचे पुनर्गठन- शेतीशी निगडित कर्ज वसुलीला स्थगिती- २०१६-१७ मध्ये कर्जमाफीपासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देणार*२. वीज बिलात दिलासा:*- ७.५ HP पर्यंतच्या कृषी पंपांचे वीज बिल आधीच माफ आहे, आता त्यावरील क्षमतेच्या पंपांनाही सूट- टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज जोडणी खंडित होणार नाही*३. थेट आर्थिक मदत:*- केंद्राच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकारकडून थेट मदत- *दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी थेट आर्थिक मदत जमा* करण्याचा प्रयत्न- पिक विम्याचे पूर्ण पैसे मिळवून देणार *४. इतर महत्त्वाच्या सुविधा:*- शालेय/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी- रोजगार हमी योजनेत (MGNREGA) नियम शिथिल करून जास्तीत जास्त कामे सुरू करणार- पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पुरवठा- जनावरांसाठी चारा आणि पाण्याची व्यवस्था- शेतीवर अवलंबून असलेल्या शेतमजुरांना अन्नधान्य पुरवठा- जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेणारपुढे काय?- दुष्काळग्रस्त भागातील नुकसानीचे *पंचनामे ५ ऑक्टोबरपासून* सुरू होणार आहेत.- पंचनाम्यासाठी फोटो आणि GPS चा वापर करून अचूक नोंद घेतली जाणार आहे.- केंद्र सरकारकडे NDRF च्या निकषांनुसार मदतीचा प्रस्ताव पाठवला जाणार आहे. हा निर्णय शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मानला जात आहे. --- ## फलटण शहर पोलीस यांच्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-shahara-palsa-yacaya-vatana-sayabra-janajagata-upakarama - **Published**: 2026-09-23 20:23 - **Category**: गुन्हेगारी - **Author**: Raj Maharashtra Times फलटण शहर पोलीस स्टेशन च्या वतीने सायबर जनजागृती उपक्रम..राज महाराष्ट्र टाइम्सफलटण : वर्तमान काळात डिजिटल युगात मोबाईल, इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहार दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहेत. अशा प्रकारच्या डिजिटल सुविधांचा वाढता वापर लक्षात घेता सायबर गुन्ह्यांचे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रकारही वाढत आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना रोखण्या साठी आणि नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद फोन, संदेश, लिंक किंवा ऑनलाइन व्यवहाराला बळी न पडता सायबर सुरक्षेबाबत सतर्क राहावे, असे आवाहन फलटण पोलिसांच्या वतीने उपस्थित सर्वसामान्य नागरिक विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक यांना करण्यात आले आहे.सायबर फसवणुकीमध्ये नागरिकांकडून OTP, PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची माहिती मिळवण्याचा प्रयत्न केला जातो. बँक, पोलीस किंवा कोणतीही सरकारी संस्था फोनवरून OTP, PIN किंवा पासवर्ड मागत नाही. त्यामुळे अशी माहिती कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. याबाबत माहिती देण्यात आलीUPI व्यवहार करतानाही विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पैसे प्राप्त करण्यासाठी QR कोड स्कॅन करण्याची आवश्यकता नसते. पैसे मिळवून देण्याच्या नावाखाली कोणी QR कोड स्कॅन करण्यास सांगत असल्यास सावध राहावे. UPI PIN हा प्रामुख्याने पैसे पाठवताना वापरला जातो, त्यामुळे अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून कोणताही व्यवहार करू नये याबाबतची सतर्कता बाळगण्याचे ही आवाहन करण्यात आले.KYC अपडेट, बँक खाते बंद होणे, वीज बिल थकीत असणे, पार्सल अडकल्याचे संदेश किंवा इतर वेगवेगळी आमिष दाखवून पाठवण्यात आलेल्या अनोळखी लिंकवर क्लिक करू नये. कोणत्याही वेबसाइटवर वैयक्तिक किंवा आर्थिक माहिती भरण्यापूर्वी वेबसाइटचा पत्ता काळजीपूर्वक तपासावा.सोशल मीडियाच्या वापरातही सावधगिरी आवश्यक आहे. अनोळखी व्यक्तींच्या Friend Request स्वीकारताना विचार करावा. हळदी अनोखी व्यक्तींकडून सोशल मीडियावर फ्रेंड्स बनवून नाही त्रास दिला जात असल्याच्या घटना घडत आहे. वैयक्तिक फोटो, मोबाईल क्रमांक, घराचा पत्ता, ओळखपत्रे किंवा इतर संवेदनशील माहिती अनोळखी व्यक्तींना पाठवू नये. बनावट Instagram किंवा Facebook अकाउंट आढळल्यास त्याची तातडीने तक्रार करावी.‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाने फसवणूक.पोलीस, CBI, ED किंवा अन्य सरकारी अधिकारी असल्याचे भासवून नागरिकांना घाबरवणे आणि त्यानंतर पैशांची मागणी करणे, हा सायबर फसवणुकीचा गंभीर प्रकार आहे. अशा वेळी घाबरून पैसे देऊ नयेत. पोलीस किंवा इतर कायदा अंमलबजावणी संस्था फोन अथवा व्हिडिओ कॉलद्वारे नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ करून पैसे घेत नाहीत.ज्येष्ठ नागरिकांनी बँक खाते, ATM, UPI, OTP आणि इतर आर्थिक माहिती कोणालाही देऊ नये. संशयास्पद फोन आल्यास घरातील विश्वासू व्यक्ती किंवा पोलीसांशी तात्काळसंपर्क साधावा.विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन संवाद करताना काळजी घेणे गरजेचे आहे. अनोळखी व्यक्तींशी चॅट करताना स्वतःचे फोटो, शाळेची माहिती, घराचा पत्ता किंवा अन्य वैयक्तिक माहिती शेअर करू नये. ऑनलाइन त्रासदायक किंवा संशयास्पद संपर्क झाल्यास पालकांना तातडीने माहिती द्यावी.🚨फसवणूक झाल्यास तात्काळ 1930 वर संपर्क करा.🚨सायबर आर्थिक फसवणूक झाल्यास वेळ न घालवता राष्ट्रीय सायबर हेल्पलाइन क्रमांक 1930 वर तातडीने संपर्क करावा. तसेच cybercrime.gov.in या अधिकृत पोर्टलवर तक्रार नोंदवावी आणि जवळच्या पोलीस ठाण्यातही माहिती द्यावी. फसवणुकीनंतर जितक्या लवकर तक्रार केली जाते, तितक्या लवकर संबंधित यंत्रणांना व्यवहारावर आवश्यक कारवाई करण्याची संधी मिळते.सायबर गुन्ह्यांपासून सुरक्षित राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर बंद --- ## कु. शिवांजली विक्रमसिंह भोसले सभापती (प.स. )फलटण यांचा गौरी गणपती सजावटीचा सांस्कृतिक उपक्रम - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/ka-shavajal-vakaramasaha-bhasal-sabhapata-pasa-faltanae-yaca-gara-ganaepata-sajavataca-sasakataka-upakarama - **Published**: 2026-09-16 11:37 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: गौरी गणपती सजावट स्पर्धा 2026 कु शिवांजली भोसले* सभापती (प.स.) फलटण यांचा सांस्कृतिक उपक्रम. गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा २०२६ राज महाराष्ट्र टाइम्स.*गणेशोत्सव 2026 च्या अनुषंगाने साखरवाडी पंचक्रोशीतील महिलांसाठी आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्याच्या उद्देशाने आणि गृहिणी महिलां चा कल्पकतेला वाव देण्याच्या उद्देशाने व आपल्या कल्पकतेने आणि कलाकुसरीने गौरी-गणपतीची सुंदर आरास सजावट स्पर्धा महिलांच्या कलेला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आकर्षक बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी या सांस्कृतिक उपक्रमातून निर्माण केली आहे.*स्पर्धेमधील विजेत्यांसहित सहभागी होणाऱ्या प्रत्येक स्पर्धकास सुद्धा आकर्षक भेट वस्तू देण्यात येणार आहे.स्पर्धेविषयी*महत्त्वाची सूचना :*१) १७ तारखेपर्यंत स्पर्धकांची नोंदणी घेतली जाईल.२) १८ व १९ तारखेला स्पर्धकांच्या गौरी-गणपती आरास सजावटीचे निरीक्षण करण्यात येईल. *बक्षिसे :**🥇 प्रथम क्रमांक — ₹५५५५/- व सन्मानचिन्ह**🥈 द्वितीय क्रमांक — ₹४४४४/- व सन्मानचिन्ह**🥉 तृतीय क्रमांक — ₹३३३३/- व सन्मानचिन्ह**🏅 चतुर्थ क्रमांक — ₹२२२२/- व सन्मानचिन्ह**🎁 पाचवे विशेष ५ बक्षीस व ५ साड्या देण्यात येतील.**साखरवाडी-पिंपळवाडी, फडतर वाडी, होळ व जिंती* या ४ गावांतील महिलांसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही गौरी-गणपती आरास सजावट स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि नोंदणी करण्यासाठी. नोंदणी व व्हिडिओ पाठविण्यासाठी WhatsApp : *8830285954*या WhatsApp नंबरवर आपल्या घरातील गौरी-गणपती सजावटीचे फोटो/व्हिडिओ पाठवावेत.व्हिडिओसोबत खालील माहिती पाठवणे आवश्यक आहे:*▫️ आपले संपूर्ण नाव**▫️ आपल्या गावाचे नाव**▫️ आपला संपूर्ण पत्ता*या स्पर्धेच्या अनुषंगाने सभापती कुमारी शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले यांनी आवाहन केले आहे की✨ स्पर्धेत या चार गावातील महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आणि आपल्या कलाकुसरीला व्यासपीठ मिळवा! ✨*कु. शिवांजली हेमा विक्रमसिंह भोसले**सभापती, पंचायत समिती फलटण* --- ## पैलवान जयदीप गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचा सामाजिक उपक्रम. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/palvana-jayathapa-gayakavada-yaca-vadhathavasanamatata-mafata-natara-tapasanae-va-shasatarakaraya-shabraca-samajaka-upakarama - **Published**: 2026-09-13 04:26 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सामाजिक उपक्रम पैलवान जयदीप गायकवाड यांचा वाढदिवसानिमित्त मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर चा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम. राज महाराष्ट्र टाइम्स. फलटण तालुक्यातील वाखरी गावचा लाल मातीतला ग्रामीण भागातून कष्टाचा व जिद्दीच्या जोरावर घडलेला रांगडा पैलवान जयदीप गायकवाड चा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या निमित्ताने समाजाचं काहीतरी देणं लागतो याची जाणीव ठेवून ज्येष्ठांच्या सेवेसाठी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर एच व्ही देसाई नेत्र रुग्णालय हडपसर पुणे यांच्या विशेष सहकार्याने आयोजित करून फलटण तालुक्यातील ज्येष्ठांची सेवा करण्याचा मनोदय केला आहे. हे शिबिर वाखरी तालुका फलटण येथील भैरवनाथ मंदिर येथे रविवार दि. 13 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी दहा ते दुपारपर्यंत आयोजित केले आहे तरी या उपक्रमात सहभागी होऊन सेवेची संधी मिळावी असे विनम्र आवाहन पैलवान जयदीप यांनी केले आहे.वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या सामाजिक उपक्रमाचे होत आहे विशेष कौतुक.पैलवान जयदीप यांना लहानपणापासूनच कुस्ती या खेळाबाबत विशेष आवड निर्माण झाली होती. वाखरी गावातील ग्रामस्थ आत्माराम मोहिते, रघुनाथ ढेकळे दयाराम शिंदे हनुमंत मोरे जगन्नाथ जाधव दादा ढेकळे पाटील अधिक ढेकळे पाटील रामभाऊ ढेकळे पाटील माऊली शिंदे धनंजय गरड मुगुटराव ढेकळे पाटील या ग्रामस्थांनी पुत्रवत प्रेम करून या रांगड्या पैलवानाचा नावलौकिक होण्यासाठी त्याचे मनोबल वाढवून वाखरी गावाचे आणि तालुक्याचे नावलौकिक होण्यासाठी अथक प्रयत्न करून एक चांगला पैलवान घडवला. या जडणघडणीत महाराष्ट्र केसरी बापूराव लोखंडे यांचे पुत्र पैलवान निलेश लोखंडे या जिवलग मित्राची साथ पैलवान जयदीप ला बहुमोल ठरली. महाराष्ट्रातील कुस्ती क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गोंदिया भोसरी पुणे नागपूर अकलूज अहिल्यानगर वारजे पुणे रोहा रायगड मुंबई बालेवाडी आणि इतर सर्व शहरात कुस्तीमध्ये आपल्या कौशल्याची आणि खेळाची चुणूक दाखवून त्याने एक आदर्श पैलवान की चा ठसा उमटवला आहे. महाराष्ट्र चॅम्पियन हिंदकेसरी चॅम्पियन भारत अमेरिका कुस्ती पनवेल महापौर केसरी असे माना चे किताब पटकावून 41 गदाचा मानकरी असणारा वाखरी गावचा सुपुत्र पैलवान जयदीप कृष्णा गायकवाड याचे कौतुक करावे तेवढे कमीच ठरेल, असा उल्लेखनीय कार्यभाग आपल्या क्षेत्रात पैलवान जयदीप ने केला आहे.पैलवान जयदीप हा लहानपणापासूनच आज्ञाधारक शिस्त संयमी आणि शांत स्वभावाचा सर्वांच्या सूचनांचा मार्गदर्शनाचा आदर करून त्यांनी आपला नावलौकिक या क्षेत्रात घडवला. पनवेल महापौर केसरी तीन वेळा महाराष्ट्र चॅम्पियन भारत पाकिस्तान कुस्ती स्पर्धेत तसेच भारत अमेरिका कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन आपल्या खेळातील कला कौशल्याची चुणूक त्याने साता समुद्रा पार पण दाखवली. पैलवान की करत असताना कधीही इतर कोणत्याही गोष्टींमध्ये दुर्लक्ष करून आपल्या खेळावर प्रेम करून कष्ट व जिद्दीच्या जोरावर अतोनात मेहनत करून पैलवान जयदीप ने हे यश प्राप्त केले आहे. यामध्ये त्याला बऱ्याचदा संघर्षासाठी झगडावे लागले. काही वेळा मिळालेल्या यशामुळे द्वेष आणि मत्सराचा सुद्धा सामना करून आप्त स्वकीय यापासून सुद्धा त्याला त्रास सहन करावा लागला परंतु तिकडे दुर्लक्ष करून आपल्या ध्येयावर लक्ष ठेवून थोरामोठ्यांचा आदर करून आणि त्यांचा आशीर्वादाने त्याने हे ध्येय प्राप्त केले आहे. भावी पिढीत घडणाऱ्या पैलवानांसाठी एक आदर्श उदाहरण म्हणता येईल. कोणत्याही गोष्टीने खचून न जाता आपल्या शांत संयमी स्वभावाने त्याने हे यशाचे शिखर प्राप्त केल्यामुळे संपूर्ण फलटण तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यातच आणि महाराष्ट्रातल्या कुस्ती क्षेत्रात --- ## राजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण पूर्ण झाल्यावरच मंडळाचा सत्कार स्वीकारणार, नगराध्यक्ष समशेर दादांचा ठाम निर्धार. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/raja-umaja-naiika-samarakaca-sashabhakaranae-paranae-jhalyavaraca-madalica-satakara-savakaranaera-nagarathhayakashha-samashara-thathaca-thama-narathhara - **Published**: 2026-09-11 19:20 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सामाजिक स्मारक उपक्रम राजे उमाजी नाईक स्मारकाचे सुशोभीकरण झाल्याशिवाय मंडळाचा सत्काराचा हार आणि नारळ स्वीकारणार नाही.नगराध्यक्ष समशेर दादांचा ठाम निर्णय. राज महाराष्ट्र टाइम्सफलटण. दिनांक सात सप्टेंबर 2026 रोजी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त फलटण शहरातील उमाजी नाईक स्मारक येथे मंडळाच्या वतीने आयोजित केलेला अभिवादनाच्या कार्यक्रम प्रसंगी नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर उपस्थित राहून राजे उमाजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व नारळ अर्पण करून अभिवादन केले. फलटण नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्ष समशेर दादा यांच्या विशेष सहकार्याने राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे सुशोभीकरणा साठी निधी उपलब्ध करण्यात आला आहे. याबाबत मंडळाने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. परंतु नगराध्यक्ष समशेर दादा यांनी या सत्काराला स्पष्टपणे नकार देत निधी उपलब्ध केला आहेच परंतु जोपर्यंत स्मारकाचे सुशोभीकरण होत नाही तोपर्यंत राजे उमाजी नाईक मंडळाच्या वतीने मी कोणताही सत्कार स्वीकारणार नाही व सुशोभीकरन पूर्ण झाल्यावरच तुमचा सत्कार स्वीकारण्यात येईल असा ठाम निर्णय त्यांनी व्यक्त करून त्यावेळी निर्धार केला.बऱ्याच वर्षापासून राजे उमाजी नाईक यांच्या स्मारकाचे प्रलंबित काम होते त्याला समशेर दादांनी निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मंडळाच्या वतीने समशेर दादांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. --- ## फलटण नगर परिषदेच्या संडे (एस एच जी एस)मार्ट ची राज्यस्तरावर दखल व विशेष प्रशंसा - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-nagara-parashhathacaya-sada-esa-eca-ja-esamarata-ca-rajayasataravara-thakhal-va-vashashha-parashasa - **Published**: 2026-09-11 17:00 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सामाजिक उपक्रम राज महाराष्ट्र टाइम्स🌟 फलटण नगर परिषदेच्या संडे SHGs मार्ट उपक्रमाची राज्य स्तरावर दखल! 🌟फलटण शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादनाला बाजार मूल्य मिळवून देण्याच्या उद्देशाने फलटण नगर परिषदेचे नगराध्यक्ष श्री. समशेरसिंह नाईक निंबाळकर आणि सर्व नगरसेवकांच्या प्रयत्नाने व मुख्याधिकारी निखिल जाधव यांच्या विशेष सहकार्याने दर रविवारी फलटण नगर परिषदेच्या प्रांगणात या संडे मार्ट ची सुरुवात करण्यात आली.मा. श्री. प्रसादराजे भोसले साहेब, राज्य अभियान व्यवस्थापक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय (DMA), नवी मुंबई, महाराष्ट्र शासन यांनी फलटण नगरपरिषदेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘संडे SHGs मार्ट’ या अभिनव उपक्रमाची विशेष प्रशंसा केली आहे.महिला बचत गटांना स्थानिक पातळीवर हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारमूल्य मिळवून देणे आणि महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना देणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाची यशोगाथा केंद्र शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.या उल्लेखनीय उपक्रमाची यशोगाथा भारत सरकारच्या गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालयामार्फत (Ministry of Housing & Urban Affairs) राष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे.ही बाब फलटण नगरपरिषद, महिला बचत गट तसेच संपूर्ण फलटण शहरासाठी अभिमानाची आणि गौरवाची असणार आहे..या स्तुत्य उपक्रमाबाबत फलटण शहरातील महिला बचत गटाच्या वतीने फलटण नगरपरिषद आणि नगराध्यक्ष समशेर दादा व महिला बालकल्याण समितीच्या सभापती नगरसेविका सौ. मोहिनी हेंद्रे . उपनगराध्यक्ष सौ. प्रियदर्शनी भोसले, तसेच इतर नगरसेविका सौ. रूपाली सस्ते, सौ. सुपर्णा अहिवळे, नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा व सर्वच नगरसेविका आणि नगरसेवक यांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी महिला बचत गटातील या संडे मार्ट मध्ये भाग घेतलेल्या महिलांनी आभार व्यक्त करताना सांगितले की आमच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून दिल्यामुळे आमच्या अर्थार्जनासाठी नक्कीच आणि आमच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी मदत होत आहे.नगराध्यक्ष समशेर दादांनी शहरातील इतर सर्व महिला बचत गटांना ही या संडे मार्ट मध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले आहे सर्वांनाच नगर परिषदेच्या वतीने विशेष सहकार्य आणि मदत केली जाईल असेही त्यांनी आवर्जून उल्लेख करताना सांगितले आहे. --- ## फलटण परिसरातीलतील 60 किलोमीटर अंतरावरील सर्व टोल नाक्यावर फलटणकरांसाठी विशेष सवलत द्या. ॲड. कांचन कन्नोजा खरात - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-parasarataltal-60-kalmatara-ataravaral-sarava-tal-nakayavara-faltanaekarasatha-vashashha-savalta-thaya-da-kacana-kananaja-kharata - **Published**: 2026-09-09 16:00 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: टोल नाका सवलत राज महाराष्ट्र टाइम्स. फलटण“फलटण एस.टी. स्टँडपासून ६० कि.मी. परिघातील सर्व टोल प्लाझांसाठी फलटण तालुक्यातील सर्व वाहनांना विशेष सवलतीचा एकत्रित वार्षिक टोल पास लागू करण्याबाबतची मागणी ॲड. कांचनकन्होजा धोंडीराम खरात यांनी केली आहे. फलटण हे सातारा जिल्ह्यातील भौगोलिक, व्यापारी, कृषी, औद्योगिक व वाहतूकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. फलटण शहर हे विविध दिशांनी जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग व प्रमुख रस्त्यांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे.फलटण शहरातून किंवा फलटण तालुक्यातून—. १). फलटण–पंढरपूर(राजुरी २०- २५ कि.मी.), २). फलटण–पुणे/जेजुरी(५०-६०), ३). फलटण–इंदापूर/बारामती -काठेवाडी पुढे (३५-४० कि.मी. काम चालू आहे), ४) फलटण–दहिवडी (मोगराळे २० कि.मि. काम चालू आहे), ५) फलटण–लोणंद–शिरवळ,(ठिकाण अद्याप निश्चित नाही)… अशा विविध दिशांनी रस्ते विकसित होत आहेत. या सर्व रस्त्यांच्या विकासाचा फायदा केवळ फलटण तालुक्याला होत नसून संपूर्ण सातारा जिल्हा, महाराष्ट्र राज्य तसेच देशातील वाहतूक व्यवस्थेला होत आहे. मात्र या राष्ट्रीय व राज्यस्तरीय पायाभूत सुविधा निर्माण करताना फलटण तालुक्यातील नागरिकांनी मोठी किंमत मोजली आहे. रस्त्यांच्या बांधकामाच्या काळात अनेक वर्षे वाहतुकीचा प्रचंड त्रास, मणक्याचे त्रास, धूळ, अपघात, अपघातांमुळे कायमचे अपंगत्व, वाहतूक कोंडी, वाहनांचे नुकसान, शेती व स्थानिक मालमत्तेवरील परिणाम तसेच दुर्दैवाने काही नागरिकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना स्थानिक पातळीवर घडलेल्या आहेत. आज या रस्त्यांचा विकास पूर्णत्वाकडे जात असताना फलटण तालुक्यातील नागरिकांना त्याचा लाभ मिळण्याऐवजी प्रत्येक दिशेने प्रवास करताना टोलचा अतिरिक्त आर्थिकभार सहन करावा लागण्याची परिस्थिती निर्माण होत आहे.. तसेच दैनंदिन कामांसाठी तालुक्याबाहेर वारंवार प्रवास करावा लागतो.त्यामुळे फलटणच्या चारही दिशांना असलेल्या तसेच निर्माण होत असलेल्या टोल प्लाझांमुळे स्थानिक नागरिकांवर सातत्याने आर्थिक भार पडत आहे. सध्याच्या व्यवस्थेत टोल प्लाझापासून २० कि.मी. अंतरातील स्थानिक वाहनांसाठी स्वतंत्र पासाची तरतूद आहे. परंतु फलटणसारख्या विस्तृत तालुक्यासाठी प्रत्येक टोल प्लाझाची स्वतंत्र २० कि.मी. मर्यादा स्थानिक नागरिकांच्या वास्तविक प्रवासाच्या गरजा पूर्ण करीत नाही. परिणामी फलटण तालुक्यातील अनेक नागरिकांना स्थानिक असूनही नियमित टोल भरावा लागतो. केंद्र शासनाने वार्षिक फास्टटॅग पासाची सुविधा उपलब्ध करून दिलेली असली तरी फलटण तालुक्यातील नागरिकांची ही मागणी सर्वसाधारण वार्षिक फास्टटॅग योजनेबाबत नसून, स्थानिक नागरिकांवर पडणारा टोलचा अतिरिक्त आर्थिक भार कमी करण्यासाठी विशेष स्थानिक सवलत देण्याबाबत आहे. एका टोल प्लाझावर साधारण ७० रुपयाच्या पेक्षा जास्त शुल्क गृहीत धरल्यास, नियमित ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या वर्षभरातील टोल खर्चाच --- ## फलटण ग्रामीण पोलिसांचा ट्रांसफार्मर चोरीच्या टोळीला दणका - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-garamanae-palsaca-tarasafaramara-caracaya-talil-thanaeka - **Published**: 2026-09-09 12:18 - **Category**: गुन्हेगारी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: फलटण ग्रामीण पोलिसांची कामगिरी फलटण ग्रामीण पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरीच्या टोळीला केले जेरबंद, दोन अट्टल सराईत आरोपी ताब्यात; तब्बल ५ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडफलटणफलटण ग्रामीण पोलिसांचा ट्रान्सफॉर्मर चोरीच्या टोळीला दणका! रेकॉर्डवरील दोन आरोपी ताब्यात; तब्बल ५ ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे उघडराज महाराष्ट्र टाइम्स,फलटण : फलटण तालुक्यात महावितरण च्या वतीने शेतकऱ्यांसाठी विद्युत पुरवठा करणाऱ्या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर चोरीच्या टोळीला फलटण ग्रामीण पोलिसांनी पॉलिसी खात्यात दाखवत गुन्हे प्रकटीकरण शाखेने रेकॉर्डवरील दोन संशयित आरोपींना ताब्यात घेत त्यांच्या कडे मोठ्या शेताफी ने चौकशी करून ट्रान्सफॉर्मर चोरीचे तब्बल पाच गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली आहे.फलटण ग्रामीण भागात मागील काही वर्षापासून सातत्याने विद्युत ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना नेहमीच सातत्याने घडत होत्या . ट्रांसफार्मर चोरीला गेल्यावर नवीन ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित होईपर्यंत शेतकऱ्यांना शेतीच्या पाण्यासाठी मोठा प्रश्न निर्माण होत होता. या चोरीच्या घटनाकडे फलटण ग्रामीण पोलीस यांनी बारकाईने लक्ष ठेवून सातारा पोलीस अधीक्षक श्री निखिल पिंगळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने खात्रीलायक माहिती घेत या चोरट्यांना जेरबंद केले आहे. फलटण ग्रामीण पोलिसांनी राज मिथुन शिंदे (रा. राजाळे, ता. फलटण) आणि सनी रमन भोसले (रा. सरडे, ता. फलटण) यांच्या संशयास्पद हालचालींवर सातत्याने लक्ष देऊन. या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी अंती वरील गुन्ह्यात यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्यावर चौकशीत आरोपींनी इतर साथीदारांच्या मदतीने ट्रान्सफॉर्मर चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. या गुन्ह्यातील चोरीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली आहे.*(तब्बल पाच गुन्ह्यांचा छडा लावण्यात मोठे यश*)फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झालेल्या पाच गुन्ह्यांशी या संशयित आरोपींचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी माहिती देताना सांगितले.,गुन्हा क्र. ४२१/२०२६, ४५५/२०२६, ४७८/२०२६, ४८१/२०२६, ३९२/२०२६या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२), ३(५) तसेच भारतीय विद्युत अधिनियम कलम १३६ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.(*एका महिन्यात १९ गुन्हे उघडकीस*)फलटण ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने गेल्या एका महिन्यात इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर आणि मोटार चोरीचे तब्बल १९ गुन्हे उघडकीस आणून कारवाई केल्याने ट्रान्सफॉर्मर चोरीमुळे त्रस्त झालेल्या शेतकरी समाधान व्यक्त करत आहेत .दरम्यान, या प्रकरणात आरोपींचे इतर साथीदार कोण आहेत? चोरीचा मुद्देमाल नेमका कुठे आणि कोणाला विकला जात होता? या चोरीच्या घटनांमागे आणखी मोठे रॅकेट आहे का? याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांची दमदार कामगिरीपोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे यांच्या आदेशाने मार्गदर्शनानुसार फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहा. पो. निरीक्षक प्रशांत सुबनावळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचे नेहमीच धडाकेबाज कामगिरी करणारेगुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दिपक पवार, आणि त्यांच्या कर्तव्यदक्ष पथकातील कर्तव्यनिष्ठ पो. ह. नितीन चतुरे, अमोल जगदाळे, श्रीनाथ कदम तसेच पो. कॉ. हनुमंत दडस यांनी कारवाईत सहभाग घेतला.फलटणच्या शेतकऱ्यांच्या वतीने फलटण ग्रामीण पो --- ## बदलत्या काळातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असावी प्रा.डॉ.अशोक शिंदे - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/bthaltaya-kalital-shakashhanaeka-aavahanana-samara-janaeyaca-kashhamata-shakashhakamathhaya-asava-paradaashaka-shatha - **Published**: 2026-09-09 10:13 - **Category**: शैक्षणिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: शैक्षणिक बदलत्या काळातील शैक्षणिक आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता शिक्षकांमध्ये असावी— डॉ. अशोक शिंदे राज महाराष्ट्र टाइम्स. फलटण. बदलत्या काळातील माहिती-तंत्रज्ञान, समाजमाध्यमे आणि ज्ञानाच्या विविध उपलब्ध स्रोतांमुळे शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदल होत आहेत. या बदलत्या परिस्थितीचे आव्हान स्वीकारून शिक्षकांनी स्वतःला सातत्याने अद्ययावत करीत विद्यार्थ्यांना केवळ ज्ञान देणारे नव्हे, तर त्यांना योग्य दिशा देणारे मार्गदर्शक, समुपदेशक आणि ज्ञानप्रक्रियेचे सुलभक म्हणून सक्षम होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुधोजी महाविद्यालय, फलटण मराठी विभागाचे प्राध्यापक डॉ. अशोक शिंदे यांनी केले. पाच पांडव आश्रमशाळा, अलगुडेवाडी येथे जैन सोशल ग्रुप, फलटण आयोजित शिक्षक दिना निमित्त शिक्षकांचे सत्कार व क्रांतिवीर उमाजी नाईक जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी पाच पांडव आश्रमशाळेतील सर्व सेवाव्रती शिक्षकांचा डॉ. शिंदे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मंगेश दोशी, जैन सोशल ग्रुपचे अध्यक्ष श्रीपाल जैन, पाच पांडव आश्रमशाळेचे संस्थापक अध्यक्ष महादेव नाळे, सचिव संतोष नाळे, मुख्याध्यापक श्री. शिंदे ,JSG संचालक डॉ.श्री. मिलिंद दोशी, सदस्य श्री.राहुल गांधी व इतर मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी प्रारंभी बोलताना डॉ. शिंदे यांनी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या सशस्त्र क्रांतीचा सविस्तर आढावा घेतला. ब्रिटिशांच्या अन्यायकारी व जुलमी राजवटीविरुद्ध उमाजी नाईक यांनी उभारलेला संघर्ष, त्यांचे शौर्य, पराक्रम आणि स्वातंत्र्याची जाज्वल्य प्रेरणा यांचे भारतीय स्वातंत्र्यलढ्याच्या इतिहासातील महत्त्व त्यांनी सविस्तरपणे अधोरेखित केले. उमाजी नाईक यांचा पराक्रम, त्यांचे शौर्य आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष हा पुढील भारतीय स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा देणारा आणि पुढील स्वातंत्र्यचळवळीच्या पायाभरणीतील मूलभूत घटक ठरला, असेही त्यांनी विवेचन केले. शिक्षक दिनाच्या संदर्भात बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, पूर्वी ज्ञानप्राप्तीची साधने मर्यादित होती; त्यामुळे शिक्षक हा विद्यार्थ्यांसाठी ज्ञानाचा प्रमुख स्रोत होता. आज मात्र इंटरनेट, डिजिटल माध्यमे, समाजमाध्यमे, विविध शैक्षणिक व्यासपीठे आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांसमोर माहितीचे असंख्य स्रोत उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे आजच्या शिक्षकाची भूमिका केवळ पाठ्यक्रम शिकविण्यापुरती मर्यादित राहिलेली नाही. आज विद्यार्थ्याला माहिती देणारे अनेक स्रोत आहेत; परंतु त्या माहितीचे ज्ञानात, ज्ञानाचे विवेकात आणि विवेकाचे जीवनमूल्यांत रूपांतर करणारा शिक्षक आवश्यक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आजच्या काळात शिक्षकांनी विद्यार्थ्यांना ज्ञानदानाबरोबरच समुपदेशन, मार्गदर्शन, चिकित्सक विचार, सर्जनशीलता, मूल्यशिक्षण आणि सामाजिक भान यांची जोड देणे आवश्यक आहे. समाजमाध्यमांमधून आणि डिजिटल विश्वातून मिळणाऱ्या माहितीची सत्यता तपासणे, योग्य-अयोग्य माहितीतील फरक समजून घेणे आणि तंत्रज्ञानाचा विधायक उपयोग करणे याबाबत विद्यार्थ्यांना सक्षम करणे ही शिक्षकांची महत्त्वाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले. शिक्षकांनी बदलत्या ज्ञानपरंपरेशी स्वतःला जोडून घेत सतत वाचन, अध्ययन, संशोधन आणि तंत्रज्ञानाचे आकलन यांना आपल्या कार्याचा अविभाज्य भाग बनवावे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याबरोबरच त्यांच्यामध्ये प्रश् --- ## वाखरी फलटण येथे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची 235वी जयंती उत्साहात संपन्न - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/vakhara-faltanae-yatha-aathaya-karatakaraka-raja-umaja-naiika-yaca-235va-jayata-utasahata-sapanana - **Published**: 2026-09-08 12:31 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सामाजिक राज महाराष्ट्र टाइम्स. फलटण (वाखरी).ब्रिटिश काळात भारताच्या स्वातंत्र्यासाठी क्रांतीची पहिली मशाल पेटवणारे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांची २३५ वी जयंती वाखरी तालुका फलटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. वाखरी गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात वाखरी गावातील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील ग्रामस्थ एकत्र येऊन आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या विचारांचा वारसा जतन करण्यासाठी पुढील पिढीला त्यांच्या विचारांची ओळख व्हावी या हेतूने दरवर्षी वाखरी येथे जयंती उत्साह साजरी करण्यात येत असते याच अनुषंगाने यावर्षीही वाखरी गावचे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे माजी चेअरमन पैलवान दादा पाटील, माजी सरपंच श्री प्रवीण गायकवाड, माजी उपसरपंच श्री अक्षय जाधव, जिल्हा परिषद शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री राकेश जाधव, सामाजिक कार्यकर्ते श्री संभाजी ढेकळे पाटील, युवा नेते पैलवान सौरभ ढेकळे पाटील, श्री गणपत जाधव व मंडळाचे प्रमुख कार्यकर्ते आणि युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. जमलेल्या सर्व ग्रामस्थांनी आद्य क्रांतिकारकांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि त्यांच्या विचारांचा वारसा आपल्या गावच्या सर्वांगीण विकासासाठी जतन करण्याचा संकल्प केला. --- ## उपमुख्यमंत्री मा अजित दादा पवार यांच्या निधनामुळे दहीहंडी उत्सव रद्द, दहीहंडी उत्सवाचा दोन लाख रुपयांचा खर्च गणपती मंदिरासाठी देणार.. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/upamakhayamatara-ma-ajata-thatha-pavara-yacaya-nathhanamali-thahahada-utasava-rathatha-thahahada-utasavaca-thana-lkha-rapayaca-kharaca-ganaepata-matharasatha-thanaera - **Published**: 2026-09-05 23:50 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सामाजिक उपक्रम राज महाराष्ट्र टाइम्सफलटण : फलटण शहरातील सामाजिक सेवेचे व्रत घेतलेले अहद सामाजिक संस्थेचे अध्यक्ष मेहबूब भाई मेटकरी मित्र मंडळाच्या वतीने यावर्षी आयोजित करण्यात येणारा दहीहंडी उत्सव राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या निधनामुळे रद्द करण्यात आला आहे. मात्र, उत्सवासाठी होणारा खर्च सामाजिक व धार्मिक कार्यासाठी उपयोगी आणण्याचा निर्णय अहद सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मेहबूब मेटकरी व संस्थेच्या उपाध्यक्षा कुमारी राजीया मेहबूब मेटकरी यांनी घेतला आहे.रविवार पेठ, मेटकरी गल्ली येथे नियोजित गणपती मंदिराच्या उभारणीसाठी दहीहंडी उत्सवासाठी करण्यात येणारा तब्बल दोन लाख रुपयांचा खर्च देण्याची घोषणा मेहबूब मेटकरी व राजीया मेटकरी यांनी केली या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.मेहबूब मेटकरी हे अहद सामाजिक संस्थेच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. कोरोना काळात गरजू व गोरगरीब नागरिकांना किराणा किटचे वाटप, रक्तदान शिबिरांचे आयोजन, शालेय विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांचे वाटप यांसह विविध सामाजिक उपक्रम त्यांच्या माध्यमातून राबविण्यात आले आहेत.रविवार पेठ येथील तालीममध्ये व्यायामाचे धडे घेतल्याने तालमी चा लाल मातीचे ऋण फेडण्यासाठीकाहीतरी देणे लागते, या भावनेतून रविवार पेठ येथील इच्छापूर्ती गणपती मंदिरासाठी शेकडो सिमेंटच्या पोत्यांचे दान करण्याचे कामही मेहबूब मेटकरी यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.मेहबूब मेटकरी यांच्या वैद्यकीय क्षेत्रातल्या उच्चशिक्षित कन्या कुमारी राजीया मेटकरी यांचा २०२६ च्या फलटण नगरपालिका निवडणुकीत निसटता पराभव झाला. मात्र, या पराभवाने खचून न जाता मेहबूब भाई मेटकरी यांच्या मार्गदर्शनाखाली त्या आपल्या प्रभागात सामाजिक कार्य प्रभावीपणे करत आहेत.माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण-कोरेगावचे आमदार सचिन कांबळे-पाटील तसेच फलटण नगरपालिकेचे नगराध्यक्ष समशेरबहाद्दर नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली मेहबूब मेटकरी व राजीया मेटकरी यांनी प्रभागातील विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केला आहे. याची दखल घेऊन नगराध्यक्ष समशेर सिंह यांनी फलटण शहरातील वैद्यकीय सेवेची जबाबदारी त्यांच्यावर दिली. मुस्लिम समाजाच्या सभागृहासाठी, गल्लीतील रस्त्यांसाठी तसेच नवदीप गणेशोत्सव मंडळाच्या मंदिरासाठी निधी उपलब्ध करून घेण्यात त्यांचा सहभाग राहिला आहे. यापैकी काही कामे सुरू झाली असून काही कामे प्रगतीपथावर आहेत.सामाजिक कार्यासोबतच विविध विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या मेहबूब मेटकरी व राजीया मेटकरी यांच्या कार्याचे प्रभागातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.दरम्यान, आगामी काळात माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या आशीर्वादाने कुमारी राजीया मेटकरी यांना फलटण नगरपालिकेत स्वीकृत नगरसेवकपदाची संधी मिळण्याची शक्यता असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. --- ## संविधान समर्थन समितीच्या वतीने फलटण येथे भव्य मोर्चा. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/savathhana-samarathana-samatacaya-vatana-faltanae-yatha-bhavaya-maraca - **Published**: 2026-09-05 01:48 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times राज महाराष्ट्र टाइम्स फलटण.संविधान संवर्धन समितीच्या वतीने जाहीर आव्हान *..चलो फलटणचा नारा.** शेड्युल कास्ट प्रवर्गा मध्ये फूट पाडून वाद लावणार यांचा जाहीर निषेध करण्या साठी व सुप्रीम कोर्टाचा निकाल अन्यायकारक असल्या मुळे तो निकाल माघे घ्यावा त्या साठी फलटण मध्ये 58 जातींच्या माध्यमातून माहा मोर्च्या आयोजित करण्यात येत आहे तरी शेड्युल कास्ट मध्ये येणाऱ्या सर्व समाज बांधवानी आप आपल्या समाजाचे प्रतिनिधी व बांधवाना या मोर्च्यात शामिल होवावे आरक्षणाचे वर्गीकरन झाले तर यात खूप मोठी हानी होऊ शकते एस. सी. प्रवर्गा साठी असणारे आरक्षण हे सर्व समाजाला बांधून ठेवते यात जर फूट पडली तर येणारा काळ गुलाम बनवण्याच्या मार्गांवर घेऊन जाईल हे लक्षात ठेवावे तरी येत्या दोन तीन दिवसात मोर्चा बाबत सर्व एस. सी. प्रवर्गातील समाजांनासोबत घेऊन तारीख आणि दिशा ठरवून हा महा मोर्चा होणार आहे*एस .सी. प्रवर्गामधील 58 समाजातील समाज सेवकांनी मोर्चा संदर्भात संपर्क करावा, असे आवाहन संविधान समर्थन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. --- ## ॲड. संदीप कांबळे यांची सातारा जिल्हा युवासेना गड किल्ले संवर्धन कक्ष अध्यक्षपदी निवड - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/da-sathapa-kabli-yaca-satara-jalha-yavasana-gada-kall-savarathhana-kakashha-athhayakashhapatha-navada - **Published**: 2026-08-29 00:50 - **Category**: राजकीय - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: गडकिल्ले संवर्धन, शिवसेना राज महाराष्ट्र टाइम्स.फलटण. फलटण येथील शिवसेनेचे युवा नेते ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांची युवा सेना गड किल्ले संवर्धन कक्ष सातारा जिल्हा अध्यक्षपदी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने निवड करण्यात आली. सातारा येथे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. वंदनीय हिंदुरुदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते माननीय ना. श्री. एकनाथजी शिंदे साहेब ( उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य), शिवसेनेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार शिवसेना पक्षाच्या वाढीसाठी आणि श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण तरुण पिढीला आत्मसात करण्यासाठी ही निवड करण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली. या निवडीबद्दल बोलताना ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांनी सांगितले की युवा सेनेच्या माध्यमातून पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी माझ्यावर दर्शविलेल्या विश्वासाच्या प्रती मी शिवसेनेच्या संघटन बांधणीस आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्वाचे विचार माननीय मुख्यमंत्री साहेबांची पक्षाच्या बाबतची असणारी संघटनात्मक बांधणी आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचे विचार तरुण पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी या माध्यमातून मी प्रयत्न करणार असून आपला सातारा जिल्हा हा गड किल्ल्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो त्या गड किल्ल्यांच्या संवर्धनाच्या कार्याची सुरुवात माझ्या घरापासून माझ्या गावापासून म्हणजेच फलटण शहराजवळ असणाऱ्या संतोषगड आणि वारुगड या किल्ल्यापासून करणार आहे. सकारात्मक विचाराच्या तरुणांना बरोबर घेऊन शिवसेनेच्या पक्ष बांधणीसाठी पण मी बळकट प्रयत्न करणार असून लवकरच याबाबत माझ्या कार्यास सुरुवात करत आहे. या उपक्रमात सातारा जिल्ह्यातील तरुणांना सहभागी करून शिवसेना पक्षाचे विचार तळागाळात पोचवण्याचे काम करणार आहे.माननीय नामदार पालकमंत्री श्री शंभूराजे देसाई यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्र प्रदान करताना शिवसेना पक्षाचे श्री धनंजय साळुंखे पश्चिम महाराष्ट्र युवा सेना गड किल्ले संवर्धन कक्ष सचिव, श्री संभाजी पाटील सातारा जिल्हाध्यक्ष युवासेना तसेच भूषण वर्पे युवा सेना प्रमुख सातारा यांची प्रमुख उपस्थिती होती. फलटण तालुक्यात कट्टर युवा शिवसैनिकाला संधी दिल्याबद्दल सर्वत्र ॲड. संदीप शिवाजी कांबळे यांचे अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा प्राप्त होत आहेत. --- ## फलटण शहरातील महावितरणच्या विज वाहिन्या आता होणार भूमिगत. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-shaharatal-mahavataranaecaya-vaja-vahanaya-aata-hanaera-bhamagata - **Published**: 2026-08-28 16:09 - **Category**: तंत्रज्ञान - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: वीज वितरण व्यवस्था. राज महाराष्ट्र टाइम्सफलटण, दि. २८ ऑगस्ट : फलटण शहरातील वीज वितरण व्यवस्था भूमिगत करण्याच्या दिशेने फलटण शहराच्या वीज वितरण समस्येबाबतचे महत्त्वाचे पाऊल पडले आहे. शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यासह वितरण व्यवस्था सक्षम आणि आधुनिक करण्यासाठी सुमारे १९९.७५ कोटी रुपयांची कामे आर डी एस एस योजनेअंतर्गत प्रस्तावित करण्यात आली आहेत. या योजनेला महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडून तत्त्वतः मंजुरी मिळाल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना पत्राद्वारे दिली आहे. हा मंजूर झालेला प्रकल्प राज्यातील पहिला प्रकल्प होत आहे.फलटण शहरातील भूमिगत वीज वितरण व्यवस्थेसाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या १७ जून २०२५ रोजीच्या पत्राच्या अनुषंगाने मुख्यमंत्र्यांनी २० ऑगस्ट २०२६ रोजी पत्राद्वारे या प्रकल्पाची सद्यस्थिती कळवली आहे.मुख्यमंत्र्यांमी पत्रानुसार फलटण शहरामध्ये भूमिगत वाहिन्यांच्या कामांसाठी वेगवेगळ्या क्षमतेच्या उच्चदाब आणि लघुदाब वाहिन्या, सर्व्हिस केबल, उच्चदाब रिंग मेन युनिट, उच्चदाब व लघुदाब फिडर पिलर आदी कामांचा समावेश आहे.यामध्ये उच्चदाब वाहिनी ५० किलोमीटर, लघुदाब वाहिनी ३५२.५ किलोमीटर, सर्व्हिस केबल १४० किलोमीटर, १०० उच्चदाब रिंग मेन युनिट आणि ५३६४ लघुदाब फिडर पिलर आदी कामांसाठी १७७.८५ कोटी रुपये प्रस्तावित आहेत.*याशिवाय ३३/२२ केव्ही क्षमतेचे नवीन उपकेंद्र* तसेच ३३ केव्हीची २० किलोमीटर आणि २२ केव्हीची १३ किलोमीटर वाहिनी यासाठी २२.१३ कोटी रुपयांची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. पत्रात नमूद केलेल्या आकडेवारीनुसार ही कामे मिळून एकूण १९९.७५ कोटी रुपयांची आहेत.‘वितरण प्रणालीचे सक्षमीकरण व आधुनिकीकरण’ या आर डी एस एस योजनेअंतर्गत प्रस्तावित कामांना महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ३० मे २०२५ रोजीच्या पत्राद्वारे तत्त्वतः मंजुरी दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.वितरण प्रणालीचे सक्षमीकरण आणि आधुनिकीकरणाशी संबंधित या कामांना केंद्र सरकारची मंजुरी मिळाल्यानंतर पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.हा प्रकल्प प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतर फलटण शहरातील सध्याच्या वीज वितरण व्यवस्थेत मोठा बदल होणार आहे. शहरातील वीजवाहिन्या भूमिगत करण्यावर या प्रकल्पात भर देण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यांलगत आणि नागरी वस्त्यांमधील वीजतारांचे जाळे पूर्णपणे कमी होण्याबरोबरच वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. यामुळे फलटण शहरातील वीज ग्राहकांच्या विविध पुरवठ्याबाबतच्या समस्याचे निराकरण होणार असून भविष्यात वीज वितरण अखंडितपणे होण्यास मदत होणार आहे.शहरासाठी नव्या उपकेंद्राचाही प्रस्ताव असल्याने वीज वितरण व्यवस्थेच्या आधुनिकीकरणाच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वाचा मानला जात आहे.फलटण शहरातील वीज वितरण व्यवस्था भूमिगत करण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता. त्यांच्या मागणीच्या अनुषंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट पत्र पाठवून प्रकल्पातील प्रस्तावित कामे आणि मंजुरीची सद्यस्थिती स्पष्ट केली आहे.या प्रकल्पासाठी आमदार सचिन पाटील यांनीही राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याची माहिती देण्यात आली आहे.फलटण तालुक्यातील खामगाव येथे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण व्यवस्थेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुढे आला --- ## हरीबाबा मंदिर फलटण येथे श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/harabb-mathara-faltanae-yatha-sharavanae-masanamatata-thharamaka-karayakaramaca-aayajana - **Published**: 2026-08-26 10:42 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: श्रावण मासानिमित्त धार्मिक कार्यक्रम राज महाराष्ट्र टाइम्सफलटण. फलटण शहरात बानगंगा नदीच्या तीरावर मलठण येथे योगी साधू श्री हरिबाबा यांचे समाधी स्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण येथे दर्शनासाठी येत असतात. या मंदिरात पूर्ण वर्षभर सदैव धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. दरवर्षीप्रमाणे संपूर्ण श्रावण मासात मंदिरामध्ये सकाळी सहा ते सात श्रींची अभिषेक आणि आरती झाल्यावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत नित्यनेमाने पूर्ण श्रावण मास पुढील प्रमाणे कार्यक्रम होत आहेत. सकाळी सात ते आठ-हरिपाठ आठ ते नऊ- श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी वाचन दुपारी तीन ते पाच. फलटण येथील महिला भजनी मंडळाचे भजन. सायंकाळी पाच ते सहा प्रवचन रात्री सात ते नऊ सांप्रदायिक भजन. तसेच पंचक्रोशीतील सर्व ज्येष्ठ कीर्तनकार पण मंदिरात येऊन आपली कीर्तन सेवा बजावत असतात. या श्रावण मासात भाविकांनी श्रींचे दर्शन घेऊन या धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. श्रीहरी बाबा साधू हे फलटणकराचे श्रद्धास्थान असून संपूर्ण महाराष्ट्रातच त्यांचा भक्तगण दिसून येतो. --- ## फलटण नगर परिषदेच्या नगरसेविका कुमारी सिद्धाली शहा या जगातील सर्वात लहान नगरसेविका - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-nagara-parashhathacaya-nagarasavaka-kamara-sathathhal-shaha-ya-jagatal-saravata-lhana-nagarasavaka - **Published**: 2026-08-25 15:05 - **Category**: राजकीय - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: फलटण शहराच्या वैभव राजकीय क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा फलटण. फलटण नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक 21 डिसेंबर 2025 रोजी पार पडली. या निवडणुकीत भाजपाच्या वतीने नगरसेवक पदासाठी कुमारी सिद्धाली अनुप शहा यांनी आपली उमेदवारी दाखल करून वयाच्या अवघ्या एकविसाव्या वर्षी नगरसेवक म्हणून विजय प्राप्त केला. आणि सर्वात लहान वयाच्या नगरसेवक लोकप्रतिनिधि म्हणून मोठी जबाबदारी प्राप्त करून आपल्या राजकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्राचा वारसा जतन करण्यास सुरुवात केली. सिद्धाली शहा यांचा हा विक्रम म्हणजे अलीकडच्या काळात राजकारणात तरुणाईचा वाढता सहभाग पाहता एक प्रकारचा आदर्श निर्माण केला आहे. राजकीय क्षेत्रातील पाठबळावर सामाजिक शैक्षणिक व समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या क्षेत्रात समाजाच्या जडणघडण आणि विकासात भिमुख भूमिकेतून एक तरुण नेतृत्व म्हणून लोकसेवेत सहभाग नोंदवताना वेगवेगळ्या नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी त्यांना मिळालेला हा बहुमान नक्कीच प्रेरणादायी ठरणार आहे. इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डस्ने जगातील सर्वात तरुण महिला नगरसेविका म्हणून कुमारी सिद्धाली शहा यांच्या नावाची अधिकृत नोंद केली असून याबाबतचे प्रमाणपत्र ही त्यांना प्रदान करण्यात आले. सातारा जिल्ह्यातील फलटण या शहराच्या बाबत ही निश्चितच मोठी अभिमानाची बाब असून त्यांचा सामाजिक शैक्षणिक आणि महिलांसाठी असणाऱ्या क्षेत्रात काम करण्याचा संकल्प पाहता पुढील भविष्यकाळात समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार विकासाची दिशा निश्चित करण्याचा त्यांचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी ग्वाही दिली आहे. कुमारी सिद्धाली शहा यांचे पिता श्री अनुप शहा (डॅडी) हे पण फलटण नगरपरिषद येथे माजी नगरसेवक म्हणून कार्यरत होते त्याच्या विचारांचा वारसा त्यांची लेक पुढे नक्कीच घेऊन जाईल असे त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून तर दिसून येत आहे. कुमारी सिद्धाली शहा यांच्या यशाबद्दल माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व ऍडव्होकेट सौ जिजामाता नाईक निंबाळकर नगराध्यक्ष श्री समशेर सिंह नाईक निंबाळकर सर्व नगरसेवक व फलटण शहरातील सर्व क्षेत्रातील ज्येष्ठ आणि मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे. --- ## वाघोशी फलटण येथे दुर्मिळ काळतोंड्या सापाला जीवदान - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/vaghasha-faltanae-yatha-tharamali-kalitadaya-sapal-javathana - **Published**: 2026-08-25 14:02 - **Category**: कृषी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: सापाच्या प्रजातीतील एका दुर्मिळ काळतोंड्या सापाला नैसर्गिक अधिवास वाघोशी (फ.)येथे घरात आलेल्या दुर्मिळ ‘काळतोंड्या’ सापाचा सुरक्षित बचावफलटण.सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाघोशी येथे बिनविषारी सापाला नैसर्गिक अधिवासात मुक्त केलेसातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील वाघोशी येथील एका घरामध्ये साप आल्याने याबाबत नेचर अँड वाईल्ड लाईफ वेल्फेअर सोसायटी, फलटण या संस्थेशी संपर्क करण्यात आला. माहिती मिळताच संस्थेचे प्रतिनिधी धीरज भोसले हे तात्काळ घटनास्थळी पोहोचले.घटनास्थळी पोहोचल्यानंतर पाहणी केली असता सदर साप हा दुर्मिळ ‘काळतोंड्या’ (Dumeril’s Black-headed Snake) असल्याचे निदर्शनास आले. संस्थेच्या प्रतिनिधींनी सापाचे सुरक्षितपणे बचाव कार्य केले. सापाला कोणतीही इजा होऊ न देता त्याची संस्थेकडे नोंद करण्यात आली आणि त्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त करण्यात आले.काळतोंड्या सापाची ओळखकाळतोंड्या किंवा कृष्णशीर्ष साप याचे वैज्ञानिक नाव Sibynophis subpunctatus असून हा पूर्णपणे बिनविषारी, लाजाळू आणि शांत स्वभावाचा साप आहे. शरीराचा रंग फिकट तपकिरी, चॉकलेटी किंवा करड्या रंगाचा असून त्याचे काळ्या रंगाचे डोके हे प्रमुख वैशिष्ट्य आहे.हा साप काही विषारी सापांसारखा दिसत असल्यामुळे नागरिकांमध्ये गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे साप दिसला म्हणून घाबरून त्याला मारण्याऐवजी तज्ज्ञांची मदत घेणे आवश्यक आहे.निसर्गातील महत्त्वकाळतोंड्या सापाचा अधिवास प्रामुख्याने ओलसर भाग, पालापाचोळा, दगड किंवा लाकडांच्या खाली तसेच मातीमध्ये आढळतो. तो प्रामुख्याने संध्याकाळी व रात्री सक्रिय असून लहान कीटक, गांडुळे, पाली, सरडे व सापसुरळ्या यांसारखे जीव खातो.त्यामुळे स्थानिक परिसंस्थेतील अन्नसाखळी आणि नैसर्गिक संतुलन राखण्यात या सापाचे महत्त्वाचे योगदान आहे.नागरिकांना आवाहन,घरामध्ये किंवा लोकवस्तीमध्ये साप आढळल्यास त्याला मारू नका किंवा स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नका. सुरक्षित अंतर ठेवून प्रशिक्षित सर्पमित्र, वन विभाग किंवा वन्यजीव बचाव पथकाशी संपर्क साधावा.वाघोशी येथील या घटनेत नागरिकांनी संस्थेशी संपर्क केल्यामुळे एका दुर्मिळ बिनविषारी सापाचा सुरक्षित बचाव करून त्याला पुन्हा त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त करता आले. --- ## फलटण शहर पोलीस स्टेशनच्या वतीने व्यापाऱ्यांशी संवाद बैठक संपन्न - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-shahara-palsa-satashanacaya-vatana-vayapariyasha-savatha-bthaka-sapanana - **Published**: 2026-08-25 13:18 - **Category**: प्रशासन - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: पोलीस प्रशासन व व्यापारी सुसंवाद बैठक फलटण. फलटण शहरात कायदा व सुव्यवस्था उत्तम राहण्यासाठी आणि फलटण शहरातील व्यापारी व नागरिक यांच्या समस्या निवारण करण्यासाठी फलटण शहर पोलीस स्टेशन येथे श्री घनश्याम बल्लाळ पोलीस निरीक्षक फलटण शहर यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधत 25 ऑगस्ट 2026 रोजी बैठक आयोजित केली होती. या बैठकीत फलटण शहरातील प्रमुख व्यापाऱ्यांनी उपस्थित राहून पोलीस प्रशासनासमोर फलटण शहरात व्यापारी आणि नागरिकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे याबाबत कल्पना देऊन पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना सहकार्य करावे अशी विनंती पण व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली. यावेळी फलटण शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांनी व्यापाऱ्यांना भुरट्या चोऱ्या तसेच उपद्रवी लोकांच्या पासून होत असणाऱ्या त्रासाबाबत तात्काळ फलटण शहर पोलीस स्टेशन येथे संपर्क साधण्यास सांगून इथून पुढे दररोज शहरातील प्रमुख चौक वरदळीची ठिकाणे बाजारपेठ येथे पोलीस प्रशासन आपली उपस्थिती दर्शवून कोणत्याही प्रकारची गैरकृत्य न घडण्यासाठी दक्षता घेण्यात येणार आहे अशी माहिती दिली. या स्तुत्य उपक्रमाचे फलटण शहरातील व्यापाऱ्यांनी स्वागत करून फलटण शहराची धार्मिक सांस्कृतिक आणि अध्यात्मिक शहर म्हणून असणारी ओळख अशीच कायम वृद्धिंगत व्हावी यासाठी पोलीस प्रशासनाने आपल्या कर्तव्यदक्षतेने नागरिक व व्यापाऱ्यांना सहकार्य करून शहरांमध्ये शांतता व कायदा सुव्यवस्था राबविण्यात यावी. अशी विनंती केली. याबाबत फलटण शहर पोलीस स्टेशनच्या सर्वच अधिकाऱ्यांनी कर्मचारी आम्ही सकारात्मक भूमिका घेऊन 24 तास पोलीस प्रशासन आपणास मदतीसाठी असेल असे प्रतिपादन पण पोलीस निरीक्षक श्री घनश्याम बल्लाळ यांनी केले. याबद्दल व्यापाऱ्यांच्या वतीने फलटण शहरातील सिटीबजार उद्योग समूहाचे नामांकित व्यापारी डॉक्टर सूर्यकांत दोशी भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष व जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते यांनी पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त केले. या सुसंवाद बैठकीत फलटण शहरातील व्यापारी श्री मंगेश जोशी रविवार पेठ येथील व्यापारी मित्र म्हणून ओळखले जाणारे दिगंबर कुमठेकर व बहुसंख्य व्यापारी उपस्थित होते. --- ## श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाच्या लालबागच्या राजाच्या क्रिकेट स्पर्धा उत्साहात संपन्न - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/sharamata-mahaganaepata-ganaeshatasava-madalicaya-llbgacaya-rajacaya-karakata-saparathha-utasahata-sapanana - **Published**: 2026-08-25 12:17 - **Category**: क्रीडा - **Author**: Raj Maharashtra Times फलटण. श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळ फलटण यांच्यावतीने क्रिकेटपटू निमराज निंबाळकर व सँडी साळुंके मित्र परिवाराने आयोजित केलेल्या भव्य हा पीच षटकार स्पर्धा 22 ऑगस्ट व 23 ऑगस्ट 2026 रोजी फलटण येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाल्या. या झालेल्या स्पर्धेमध्ये सस्तेवाडी च्या क्रिकेट टीमने प्रथम क्रमांक पटकावून रोख बक्षीस रुपये 10005व ट्रॉफी प्राप्त केली तर द्वितीय क्रमांक कोळकी येथील क्रिकेट टीमने रोख बक्षीसरुपये 5005व ट्रॉफी पटकावली. फलटण व जाधव वाडी येथे असणाऱ्या नामांकित आयडियल स्कूलच्या संस्थापक अध्यक्ष श्रीमती वैशाली शिंदे यांच्या शुभहस्ते दोन्ही संघांना बक्षीस व ट्रॉफी प्रदान करण्यात आली. यावेळी या स्पर्धेमध्ये खेळलेल्या एकूण 18 संघांनी आपली उपस्थिती दर्शवून शेवटच्या मॅचचा थरार अनुभवला. या बक्षीस वितरणाच्या वेळी बोलताना संस्थापक अध्यक्ष फलटण तालुक्यातील युवा नेते आणि माझी मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे श्री अमोल भैया निंबाळकर यांनी सांगितले की पूर्वीपासूनच आपल्या फलटण शहरात मागील चार-पाच पिढ्यापासून क्रिकेट हा खेळ अतिशय फलटण तालुक्याचा आवडीचा खेळ म्हणून ओळखला जातो यावेळच्या युवा पिढीने ही तोच वारसा पुढे जतन केला आहे आणि फलटण तालुक्यातून चांगले क्रिकेटपटू तयार होण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचे आमच्या मंडळाच्या यावर्षीच्या 24व्या वर्षी पासून आम्ही पहिले पर्व सुरू केले आहे भविष्यात उत्कृष्ट क्रिकेटपटू तयार होण्यासाठी मंडळाच्या वतीने आमचे नवोदित खेळाडूंना सर्वतोपरी सहकार्य लाभणार आहे. या कार्यक्रमाच्या वेळी या वर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे सिव्हिल इंजिनिअर अँड कॉन्ट्रॅक्टर व जेष्ठ पत्रकार उपस्थित होते. यावर्षीचा उत्सव हा आगळावेगळा गणेशोत्सव असून पारंपारिक पद्धतीने उत्सव साजरा करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला या कार्यक्रमाच्या या वर्षीच्या मंडळाच्या महिला अध्यक्ष म्हणून श्रीमती वैशाली शिंदे ऑडिओ स्कूल फलटण यांची नियुक्ती करण्यात आली या स्पर्धा संपन्न होण्यासाठी क्रिकेटपटू निंबराज निंबाळकर व त्यांच्या इतर सर्व मित्र परिवारांनी मेहनत घेऊन स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्याबद्दल फलटण शहरातील क्रिकेट प्रेमींच्या वतीने त्यांचे विशेष कौतुक होत आहे --- ## खंडोबा ऍग्रो सर्विसेस फलटणचा सर्वात लहान रुंदीचा आपोलो ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी वरदान - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/khadab-eigara-saravasasa-faltanaeca-saravata-lhana-rathaca-aapal-tarakatara-shatakariyasatha-varathana - **Published**: 2026-08-24 14:56 - **Category**: कृषी - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: शेती अवजारे फलटण. सातारा जिल्ह्याचे अपोलो ट्रॅक्टर चे अधिकृत विक्रेते श्री खंडोबा ऍग्रो एजन्सी फलटण येथे या ट्रॅक्टरच्या विक्री द्वारे ऊस शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सर्वात कमी रुंदीचा म्हणजेच अडीच फूट रुंदीचा आपोलो ट्रॅक्टर वरदान ठरत आहे. आता हा ट्रॅक्टर फोरव्हील ड्राईव्ह मध्ये सुद्धा उपलब्ध असून या ट्रॅक्टर द्वारे सर्वात कमी रुंदीच्या उसाच्या पट्ट्यातील शेतीची उत्तम मशागत करता येते पिकाला कोणतीही हानी न होता अतिशय जलद गतीने माफक इंधनाद्वारे कमी वेळात उत्तम मशागत करणे हे या ट्रॅक्टरचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे हा ट्रॅक्टर फलटण येथील मार्केट यार्ड परिसरात गाळा नंबर 81, 82 येथे या ट्रॅक्टर साठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजारांसहित उपलब्ध आहे. ऊस शेती करणाऱ्या तसेच इतर शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी मार्केट यार्ड येथे संपर्क क्रमांक 9503444297 या क्रमांकावर संपर्क साधून चौकशी व भेट देऊ शकता --- ## फलटण नगर परिषदेच्या वतीने संडे एस एम जी मार्ट चा शुभारंभ - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/faltanae-nagara-parashhathacaya-vatana-sada-esa-ema-ja-marata-ca-shabharabha - **Published**: 2026-08-24 14:06 - **Category**: सामाजिक - **Author**: Raj Maharashtra Times - **Tags**: महिला बचत गटाच्या उत्पादनांची बाजारपेठ कॅटेगरी फलटण. फलटण नगर परिषदेच्या वतीने शहरातील महिला बचत गटांच्या उत्पादित विविध उत्पादनासाठी हक्काची बाजारपेठ निर्माण होण्यासाठी फलटण नगर परिषदेच्या वतीने दर रविवारी संडे एस एम जी मार्च सुरुवात करण्यात आली. महिला बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित झालेल्या मालांना हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी हा एक यशस्वी प्रयत्न नगर परिषदेच्या वतीने करण्यात आला आहे. या शुभारंभाच्या दिवशीच फलटण शहरातील विविध बचत गटांनी आपल्या उत्पादित मालांचा स्टॉल फलटण नगर परिषदेच्या प्रांगणात उभा केला व या महाडचा शुभारंभ आमदार सचिन पाटील ज्येष्ठ नेते प्रल्हाद तात्या पाटील नगराध्यक्ष समशेर सिंह नाईक निंबाळकर तसेच शिवरूप राजे खर्डेकर उपनगराध्यक्ष सौ प्रियदर्शनी भोसले महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ मोहिनी हेंद्रे सौ,नगरसेवक आणि नगरसेविका आणि फलटण शहरातील भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात आला.यावेळी आमदार सचिन पाटील यांनी प्रतिपादन केले की शहरातील सर्वच महिलांच्या बचत गटांनी या संडे मार्ट मध्ये सहभागी होऊन आपल्या उत्पादनांची विक्री करून सहभाग नोंदवावा तसेच इथून पुढे भविष्यकाळात यासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक मदतीसाठी आम्ही सदैव सक्रिय राहू. नगराध्यक्ष समशेर सिंहयांनी यावेळी बोलताना सांगितले की महिला बचत गटांसाठी नगरपरिषदेच्या वतीने सर्व नगर परिषदेच्या माध्यमातून सर्वच बचत गटांना सहभागी करून एक वेगळ्या प्रकारची आठवड्याची हक्काची बाजारपेठ तयार करण्याचा आमचा प्रयत्न राहील. यावेळी भाजपचे पदाधिकारी महिला आघाडीच्या फलटण तालुका अध्यक्ष सौ उषाताई राऊत सौ विजया कदम व इतर सर्व नगरसेविका व पदाधिकारी उपस्थित होते. --- ## श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळाचा फलटणचा लालबागचा राजाच्या आगमनाची प्रतीक्षा. - **URL**: https://rajmaharashtratimes.com/news/sharamata-mahaganaepata-ganaeshatasava-madalica-faltanaeca-llbgaca-rajacaya-aagamanaca-paratakashha - **Published**: 2026-08-21 10:40 - **Category**: सांस्कृतिक - **Author**: Raj Maharashtra Times फलटण. श्रीमंत महागणपती गणेशोत्सव मंडळ फलटण चे संस्थापक अध्यक्ष युवा नेते श्री अमोल भैया निंबाळकर यांच्या श्री गणेशाच्या चरणी असलेल्या श्रद्धा आणि निष्ठेच्या माध्यमातून यावर्षी वर्ष 24 वे गणेशोत्सवाचे साजरे होत आहे यावर्षीचा उत्साह अत्यंत दिमागदार आणि सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाच्या कार्यक्रमांचे आयोजन असणार आहे. तरी या गणेश स्थापनेच्या दिवशी लालबागच्या राजाची विधीवत स्थापना करण्यासाठी सर्व गणेश भक्तांनी गणेश चतुर्थीच्या दिवशी सकाळी नऊ वाजता महात्मा फुले चौक येथे स्थापनेच्या ठिकाणी हजर राहावे अशी विनंती श्री. अमोल भैया निंबाळकर संस्थापक अध्यक्ष व यावर्षीच्या उत्सवाचे अध्यक्ष राजाभाऊ बोंद्रे आणि उपाध्यक्ष आसिफ बागवान यांनी केली आहे 22 व 23 ऑगस्ट 2026 रोजी भव्य हा पीच षटकार स्पर्धांचे आयोजन क्रिकेटपटू निंबराज निंबाळकर आणि सँडी साळुंखे यांनी आयोजन केले आहे. यामध्ये भव्य स्पर्धा होणार असून बक्षीस वितरण गणेशोत्सव कालात करण्यात येणार आहे14 सप्टेंबर गणेश चतुर्थी दिवशी विधीवत स्थापना होणार आहे. आणि पारंपारिक मिरवणुकीने अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी 26 सप्टेंबर 2026 रोजी नीरा नदी येथे भिवाई मातेच्या असणाऱ्या डोहात विसर्जन पारंपारिक पद्धतीने होणार आहे.